मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना आपआपल्या घरी जाण्याची विनंती केली आहे. शांततेत आंदोलन करायचे आहे त्यामुळे सगळे घरी जा. देवेंद्र फडणवीस घाबरले आणि त्यांनी संचारबंदी लावल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे आपले धरणे आंदोलन सुरु आहेत ते सुरुच ठेवा. गावातीलपण पाच बांधव इथे थांबा बाकी सगळे घरी जा.
advertisement
जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले असून बसही पेटवून देण्यात आली आहे. अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी लगेच मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. तोपर्यंत मराठा बांधवांनी घरी जावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.
जरांगे पाटील म्हणाले की,“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन. सगळ्यांनी शांततेत आपआपल्या गावी जावं.” मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईला जाणे टाळले. पुन्हा अंतरवाली सराटीकडे फिरले. कायद्याचा आणि पोलिसांचा सन्मान म्हणून एक पाऊल मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलं.
