समाजात गैरसमज पसरवू नये : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी सरकारची सुपारी घेवून बोलू नये असं म्हणत जरांगे पाटलांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. मुंबईतल्या आंदोलनातून काय मिळालं असल्याचा सवाल राज ठाकरेंनी विचारला होता. त्याला जरांगे पाटलांनी सडेतोड उत्तर दिलंय. राज ठाकरेंना विनंती आहे, तुम्हाला आमचा समाज खुप मानतो आहे. मात्र, तुम्ही दोन वेळा स्टेटमेंट करून समाजात गैरसमज पसरवू पाहत आहेत. आमच्या समाजाला माहीत आहे. कोण समाजाकडून आहे आणि कोण नाही. आम्हाला आंदोलनातून काय मिळालं बघायचं असेल तर घटना अभ्यासकाला बोलून घ्या आणि मग बघा. मात्र, सरकारची सुपारी घेवून बोलू नये असं राज ठाकरेंना सुनावलं आहे.
advertisement
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
माझी एखादी गोष्ट सुरुवातीला कडवट वाटते, पण ती सत्य असते. मी तेव्हाच जरांगे पाटलांना सांगितलं होतं, त्यांची मागणी मान्य होणार नाही. विजय झाला मग पुन्हा उपोषणाला का बसता असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांन केला आहे. आंदोलनात नेमकं काय घडलं हेच आंदोलकांना कळालं नाही. मराठा आरक्षण हा तांत्रिक विषय आहे, आरक्षणाची वस्तूस्थिती समजून घेतली पाहिजे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
वाचा - 'तर नाशिकमधून निवडणूक लढू देणार नाही' राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
लोकसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या चाचपणी चालू आहे, ज्यांची सत्ता आहे, ते पण चाचपणी करतात मग आम्ही नको का करायला? चाचपणीनंतर निर्णय घेतला जाईल. राज्यातील सर्व जागा लढवाव्यात अशी पक्षातून मागणी असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.