TRENDING:

तुळजापुरला दर्शनाला जायचा होता प्लॅन, आई वडिलांनी नकार देताच मुलाने संपवलं जीवन

Last Updated:

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका दहावीत शिकणाऱ्या मुलाने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका दहावीत शिकणाऱ्या मुलाने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. तुळजापूरला दर्शनाला जाऊ न दिल्याच्या कारणातून या मुलाने जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे संबंधित मुलगा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
News18
News18
advertisement

नैतिक सदाशिव सोनुने असं आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षीय मुलाचं नाव आहे. तो भोकरदन तालुक्यातील लेहा गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो गावातील शाळेत दहाव्या वर्गात शिकत होता. मागील काही दिवसांपासून त्याने आणि त्याच्या काही मित्रांनी दुचाकीने तुळजापूरला दर्शनासाठी जाण्याची तयारी केली होती. नैतिकने याबाबत घरी वारंवार तगादा लावून धरला होता.

advertisement

परंतु, सध्या पावसाचे दिवस असल्याने आणि वातावरण खराब असल्याने आईने त्याला तुळजापूरला जाण्यास नकार दिला. पाऊस उघडल्यावर आपण सर्वजण सोबत जाऊ, असेही आईने त्याला सांगितले. पण मित्रांसोबत जायचं प्लॅनिंग केलं असताना आई वडिलांकडून अशाप्रकारे आडकाठी आणली गेल्याने नैतिक दुखावला.

शनिवारी आई शेतात भुईमुगाच्या शेंगा गोळा करण्याचं काम करीत होती, तर वडीलही कामात होते. त्याचे आजोबा गावातील एका अंत्यविधीसाठी गेले होते. त्याच वेळी त्याने घरात कुणीही नसताना नैतिक गळफास घेऊन आत्महत्या केली. आजोबा घरी आले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून डोकावलं असता नैतिकने गळफास घेतल्याचे दिसून आले.

advertisement

हा प्रकार उघडकीस येताच नातेवाइकांनी त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. एकलुत्या एक मुलाने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
तुळजापुरला दर्शनाला जायचा होता प्लॅन, आई वडिलांनी नकार देताच मुलाने संपवलं जीवन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल