TRENDING:

Jayakwadi Dam : धरणाचे 18 दरवाजे उघडले अन् त्याने पुलावर कार घातली, जायकवाडी समोरचा स्टंटबाजीचा VIDEO

Last Updated:

धरणावरील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. असे असताना देखील एका कार चालकाने या दगडी पुलावरून कार चालवून स्टंटबाजी केल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jayakwadi Dam Car Stunt-
Jayakwadi Dam Car Stunt-
advertisement

Jayakwadi Dam Car Stunt :अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात तुफान पाऊस पडतो आहे.या पावसामुळे जायकवाडी धरण काटोकाट भरले आहे.त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.त्यामुळे धरणावरील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. असे असताना देखील एका कार चालकाने या दगडी पुलावरून कार चालवून स्टंटबाजी केल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर संबंधित कारचालकारवर कारवाईची मागणी जोर धरते आहे.

advertisement

छत्रपती संभाजी नगरमधील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सूरू आहे. कारण धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेला दगडी पुल पाण्याखाली गेला होता.या पुलावरून तुफान वेगाने पाणी वाहत होते. असे असताना एका कारचालकाने या पुलावर गाडी चालवून स्टंटबाजी केल्याचा प्रकार घडला आहे.या स्टंटबाजीचा व्हिडिओ काहींनी आपल्या कॅमेरात कैद केला होता.त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

advertisement

खरं तर या पुलावरून कोणतीही वाहतूक करण्यास मनाई आहे. पोलीस आणि धरण प्रशासनाने देखीव दगडी पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.तसेच सूचनाफलक देखील लावले आहे मात्र तरी देखील नियमांना धाब्यावर बसवून या कार चालकाने जुने कावसन या गावाच्या मार्गावरून पैठण शहराच्या दिशेने पुलाने भरलेल्या पाण्यातून कार नेली होती.त्यानंतर कारचालकाचा स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हारयल झाला होता.त्यामुळे आता या कारचालकावर कारवाईची मागणी जोर धरते आहे.

advertisement

जायकवाडी धरणातून गेल्या 8 दिवसांपासून सूरू असलेला विसर्ग शुक्रवारी कमी करण्यात आला होता. गुरूवारी धरणातील आवक वाढल्याने 75 हजार 456 क्युसेकपर्यंत गेला होता. मात्र आवक घटल्याने शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून चार टप्प्यामध्ये विसर्ग कमी करत तो 28 हजारापर्यंत आणण्यात आला आहे .

advertisement

दरम्यान वाढलेल्या विसर्गामुळे पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील घाटावर पाणी आले.यावेळी मोठ्या प्रमाणात नागरीकांनी पाण्याचे दृष्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच गोदीवरी नदीलगतचे सिद्धेश्वर महादेव मंदिर पुर्णपणे पाण्याखाली गेले आहे.त्यामुळे दोन दिवसांपासून भाविकांना महादेवाचे दर्शन घेता आले नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jayakwadi Dam : धरणाचे 18 दरवाजे उघडले अन् त्याने पुलावर कार घातली, जायकवाडी समोरचा स्टंटबाजीचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल