जितेंद्र आव्हाड म्हणाले, आम्ही जे वर्षानुवर्षे बोलतोय की मनुवाद्यांच्या डोक्यातलं चतुर्वान्यांच भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणाच असेल असं सोलापूरकर म्हणतोय त्याने बाबासाहेबांना ब्राह्मणही करुन टाकलं. आता त्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे त्याच्या कानशिलात लावली तर याच्यातला मनुवाद बरोबर जागा होईल . शिवाजी महाराजांबद्दल, बाबासाहेबांद्दल बोलायचं आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची काय गरज आहे.
advertisement
कोणी नाही मारलं तरी मी तुला झोडणार :जितेंद्र आव्हाड
सोलापूरकर तुला एवढं बोलायचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं आहे, गप्प आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे पण मागे घे आणि बाबासाहेबद्दलचे पण मागे घे ... कोणी नाही मारलं तरी मी तुला झोडणार, मी तुला मारणार ... बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. लोकांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या, तू थेट त्यांना ब्राह्मण करतो आणि आरे तुरे करतो, तुझी लायकी आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
सोलापूरकर जे काय बोललाय, बरळलाय यातून फक्त वाद निर्माण होऊ शकतात : जितेंद्र आव्हाड
कुठल्या एका चित्रपटामध्ये भूमिका केली म्हणून तू काय अमिताभ बच्चन झालास का? सोलापूरकर जे काय बोललाय, बरळलाय यातून फक्त वाद निर्माण होऊ शकतात. यातून फक्त माथी भडकू शकतात आणि माथी भडकणार आणि याला जन्माची अद्दल शिकवणार,असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.