शिवसेनेत महापौर पदावरून हालचालींना वेग आलेला आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर गटनेते विश्वनाथ राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह राजेश कदम, सागर जेधे देखील उपस्थित होते. उद्या गुरूवारी महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच शिवसेना महापौरपदाचे नाव जाहीर करणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाच्या स्पर्धेत कोण कोण?
advertisement
खुला वर्ग
-निलेश शिंदे
-विश्वनाथ राणे
महिला खुला वर्ग
-वृषाली जोशी
-कविता म्हात्रे
अनुसूचित आरक्षण
-हर्षला थविल
-सुप्रिया भोईर
-रमेश जाधव
स्थायी समिती सभापती
-कुणाल पाटील
-मल्लेश शेट्टी
-रमेश म्हात्रे
-नवीन गवळी
-विकास म्हात्रे
कल्याण डोंबिवलीत मनसेची एकनाथ शिंदे यांच्या सेनेला पाठिंबा
एकत्र आलोय ते एकत्रित राहण्यासाठी असा प्रचार महापालिका निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आला. मात्र निवडणुकीचा निकाल लागताच दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्याच्या दिसतात. कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे. शिंदे-मनसेने एकत्र येऊन शिवशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. दुसरीकडे शिंदेसेनेवर दबाव टाकून वाटाघाटीत बाजी मारण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे होते. मात्र मनसेने शिंदेसेनेचे हात बळकट केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हिरमोड झाला आहे. स्थानिक राजकारण वेगवेगळी वळणे घेत असताना मनसेची याला मूकसंमती असल्याचे दिसते.
