खरं तर सध्या राज्यात सैफ अली खान हल्लाप्रकरण चांगलंच तापलं आहे. त्यातल्या त्यात काल सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांग्लादेशी असल्याची माहिती समोर आली होती.यासंबंधित ठोस पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांग्लादेश रोहिंग्यांविरूद्ध आक्रमक होत मोहिम आखण्याचा इशारा दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी बांग्लादेशी मुद्याला गांभिर्याने घेत थेट व्होट जिहाद पार्ट 2 अशी मोहिम राबवण्याचा इशारा दिला आहे.त्यानुसार आज त्यांनी संभाजीनंगर जिल्ह्यातील बांग्लादेशी रोहिंग्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली एक पत्र सोशल मीडियावर शेअर केली आहे.या पत्रात संभाजीनगर जिल्ह्यात किती बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, याची तालुकानिहाय आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार संपूर्ण संभाजीनगर जिह्यातील 9 तालुक्यात तब्बल 10 हजार 68 बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे या 9 तालुक्यांमधील एकूण 10 हजार 68 अर्जापैकी बांग्लादेशी रोहिंग्यांच्या जन्म प्रमाणपत्रांसाठी सर्वाधिक 4 हजार 730 अर्ज हे एकट्या सिल्लोडमधून केले गेले आहेत. हा तालुका महायूतीचे आमदार अब्दुल सत्तार यांचा आहे. याच मतदारसंघात सर्वाधिक बांग्लादेशी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोमय्या यांनी अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता बांग्लादेशी रोहिंग्यांच्या जन्म दाखल्याच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच हा व्होट जिहाद पार्ट 2 असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपानंतर आता अब्दुल सत्तार टार्गेटवर आले आहेत.
