TRENDING:

कोल्हापुरात सरपंच देशमुखांसारखाच खून? जेवायला सांगून गेले, घरी परतलेच नाही, पोलिसांना जंगलात हाडं मिळाली

Last Updated:

पाटगावचे सरपंच महेश पिळणकर हे ७ जानेवारी २०२६ रोजी मित्रांकडे जेवायला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. तेव्हापासून ते गायब आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : कोल्हापूरच्या भूदरगड तालुत्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. कुटुंबीय नातेवाईक त्यांचा शोध घेतायत, पण त्यांचा पत्ता लागत नाहीये. त्यामुळे त्यांचं नेमकं काय झालं असावं, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे कोल्हापूर पोलिसांना एका व्यक्तीचे जंगल परिसरात अवशेष मिळाले आहेत.
 पाटगावचे सरपंच महेश पिळणकर यांची हत्या?
पाटगावचे सरपंच महेश पिळणकर यांची हत्या?
advertisement

कोल्हापूर शहरालगत असलेल्या मनेरमळा परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती आहे. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनेरमळा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत आढळून आला. डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

पाटगावचे सरपंच महेश पिळणकर हे ७ जानेवारी २०२६ रोजी मित्रांकडे जेवायला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. तेव्हापासून ते गायब आहेत. कुटुंबीय नातेवाईकांनी तक्रारी करूनही पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात अपयश आले. दरम्यान, पोलिसांना मिळालेले अवशेष नेमके कशाचे आहेत? हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. तसेच अवशेष मिळून दोन महिने झाले तरी अवशेषांसंबंधी अहवाल प्राप्त झालेला नाही.

advertisement

'महेश पिळणकर यांचं काय झालं असावं?'

महेश पिळणकर यांचं काय झालं असावं? असा सवाल पिळणकर कुटुंबीय विचारीत आहेत. सरपंच पिळणकर यांच्या प्रकरणात कोल्हापूर पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ संविधान हक्क संघर्ष समिती आंदोलन करणार आहेत.

'मास्क घातलेला माणूस महेश पिळणकरांच्या मागे बसला होता'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
2 बहिणी बनल्या बॉस, नोकरी अन् शिक्षण सांभाळत करतात मोमोज व्यवसाय, इतकी कमाई
सर्व पहा

मित्राकडे जेवायला जातो, असे सांगून ते ज्यादिवशी घराबाहेर गेले त्यादिवशी एका स्थानिक ट्रॅक्टर चालकाने महेश पिळणकर यांच्यामागे मास्क घातलेला माणूस बसला होता, अशी माहिती दिली. याची चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. काही संघटनांकडून पाटगावचे सरपंच महेश पिळणकर यांच्याबाबतीत मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती घडली का? असा संशय व्यक्त करीत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापुरात सरपंच देशमुखांसारखाच खून? जेवायला सांगून गेले, घरी परतलेच नाही, पोलिसांना जंगलात हाडं मिळाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल