कोल्हापूर: राज्यभरात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालाचे कल हाती आले आहे. कोल्हापूरमधील मुरगुड नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं झेंडा फडकावला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंना मोठा धक्का बसला आहे.
नगर पंचायत आणि नगर परिषदा निवडणुकीसाठी कागल आणि मुरगुडमध्ये कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रिफ आणि समरजीत घाटगे एकत्र आले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे पॅनेल उभं होतं. त्यामुळे या दोन नगरपरिषदेत चुरस निर्माण झाली होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारहील आहे. शिवसेना शिंदे गटाचे १६ नगरसेवक विजयी झाले आहे. तर शिवसेनेच्या नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ४ जागांवर विजय मिळाला आहे.
advertisement
शिरोळ्यात आमदार मानेंचा मानहानीकारक पराभव
शिरोळा नगरपंचायतीमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. कोल्हापुरातील शिरोळ्यात आमदार अशोकराव माने यांच्या मुलगा सुनेचा होमपीचवर दारुण पराभव झाला आहे. आमदार अशोकराव माने यांच्या मुलगा सुनेचा होमपीचवर दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिरोळातील मतदारांना भाजप ताराराणी आघाडीला नाकारलं. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका अरविंद माने पराभूत झाल्या आहेत. नगरसेवक पदाच्या अरविंद अशोकराव माने पराभूत झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतचा निकाल एकूण नगरपरिषद/पंचायत-१३
भाजप-3
शिवसेना-5
राष्ट्रवादी-2
ठाकरे-0
काँग्रेस-01
शरद पवार गट-00
इतर-(जनसुराज्य) 02
हातकणंगले नगरपंचायत
हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्ष पदी शिवसेनेचे अजितसिंह पाटील विजय
शिंदे गट 6
काँग्रेस 5
शिवसेना ठाकरे 1
भाजप 2
अपक्ष 3
