मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय उत्कर्ष देसाई हा पाटगावमध्ये हाफ पिटच टेनिस बॉलचा क्रिकेट सामना खेळत होता. हा सामना रंगात आला होता. मैदानात तुफान जल्लोष सूरू होता, आणि प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गडगडाट सूरू होता. या सगळ्यात सामन्यात उत्साह असताना उत्कर्ष देसाई अचानक मैदानावर कोसळतो. उत्कर्ष देसाईला मैदानावर पडताना पाहून एकाएकी मैदानात शांतता पसरते.
advertisement
उत्कर्ष देसाई पडताच त्याचे मित्र त्याला काय झालं हे बघायला त्याच्याजवळ पोहोचले. यावेळी उत्कर्ष देसाई बेशुद्धा अवस्थेत पडला होता. त्यामुळे त्याला त्याच्या मित्रांनी तत्काळ उचलून गारगोटी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मैदानावर खेळत असतान त्याला हार्टअटॅक आला होता, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
दरम्यान उत्कर्ष देसाई हा मुलगा बिंद्री येथील दूध सागर विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याच्या या अकस्मात निधनाने देसाई कुटुंबियावर आणि पाटगावावर शोककळा पसरली आहे.
