TRENDING:

पांढऱ्या फडक्यात जनावराचं काळीज, भोवती कुंकू, लिंबू अन्.., कोल्हापुरात मध्यरात्री अघोरी प्रकार, पाहा VIDEO

Last Updated:

Crime in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील इंगळी गावाच्या हद्दीत मध्यरात्री आठ ते दहा तरुणांनी एकत्र येऊन अघोरी पूजा केल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर सालोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: ऐन दिवाळी सणाच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातून अत्यंत धक्कादायक आणि अघोरी प्रकार समोर आला आहे. कागल तालुक्यातील इंगळी गावाच्या हद्दीत मध्यरात्री आठ ते दहा तरुणांनी एकत्र येऊन अघोरी पूजा केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण इंगळी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
News18
News18
advertisement

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुण गावात फिरत असल्याचा आणि गावाच्या कमानीजवळ काहीतरी संशयास्पद कृत्य करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अघोरी पूजेत नेमके काय होते?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या तरुणांनी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागी हा अघोरी विधी केल्याचे उघड झाले आहे. पूजेच्या ठिकाणी जनावराचं काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवले होते. त्याभोवती मोठ्या प्रमाणात कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचे कट केलेले भाग ठेवण्यात आले होते. पहाटेच्या वेळी ग्रामस्थांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

advertisement

ग्रामस्थांना घातपाताचा संशय

ऐन दिवाळीच्या काळात, भर रस्त्यात अशा प्रकारे जनावराच्या काळीजाचा वापर करून अघोरी पूजा केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली आहे. काहीतरी अशुभ आणि वाईट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडला असावा, असा ग्रामस्थांना संशय आहे. या प्रकारामुळे इंगळी गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी जा अन् संध्याकाळी परत या, कल्याणमधील फेमस पिकनिक स्पॉट, तुम्ही पाहिले का?
सर्व पहा

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आठ ते दहा संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. हे तरुण नेमके कोण आहेत? त्यांनी कोणत्या उद्देशाने ही अघोरी पूजा केली? यामागे अन्य काही कारण आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पांढऱ्या फडक्यात जनावराचं काळीज, भोवती कुंकू, लिंबू अन्.., कोल्हापुरात मध्यरात्री अघोरी प्रकार, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल