या सहा नृत्यांगणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणामुळे केला, याचे नेमके कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, या तरुणींना सलग दोन महिने महिला सुधारगृहात राहावे लागल्याने नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी कारवाई
विशेष म्हणजे, या सहा तरुणींना दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी एका कारवाईदरम्यान ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी पोलिसांनी कोल्हापुरातील कात्यायनी परिसरातील एका फार्महाऊसवर धाड टाकली होती. या फार्महाऊसवर या सहाही तरुणी डान्स पार्टी करताना आढळून आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन महिला सुधारगृहात पाठवलं होतं. आता या सहाही डान्सर तरुणींनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
advertisement
एकाच वेळी सहा तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने महिला सुधारगृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या या सर्व महिलांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.