समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तीन महिलांसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश शशिकांत बारटक्के (रा. मोरेवाडीनगर), रवीराज रामचंद्र कवाळे (रा. राजारामपुरी पहिली गल्ली), तेजस विरुपाक्ष जंगम (रा. वाशी नाका), वनिता अशोक पोवार (रा. टेंबलाईवाडी), तंझीला तौफिक रुकडी, सायली शुभम पाटील (दोघी रा. उचगाव, कोल्हापूर) गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.
advertisement
Weather Alert: 24 तास महत्त्वाचे, पश्चिम महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल, सोलापूरला अलर्ट
पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पि. बा. पाटील मळ्यात सोमवारी (15 सप्टेंबर) पाच ते सहा जण महापालिकेचे कर्मचारी म्हणून फिरत होते. रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर उचगाव अशा मजकुराची 20 रुपये किमतीची आरोग्य तपासणीची पावती देऊन त्यांनी काही महिलांची तपासणी केली आणि औषधेही दिली होती.
गणेश बारटक्के, रवीराज कवाळे, तेजस जंगम, वनिता पोवार, तंजिला रुकंडी, सायली पाटील हे गळ्यात ओळखपत्र अडकवून रत्नलीव्ह सिरप, दिया अमृत, दिव्य आरोग्य, रत्न संजीवनी, रत्न फेम सिरप, नारी सखी सिरप, अधिररत्न सिरप, फेनेरील प्लस गोळ्या, त्रिफला गोळ्या, अधिरत्न गोळ्या, सुवर्णप्राश ड्रॉप, अर्थोरत्न टॅब्लेट अशी औषधे देत होते. या औषधांची किंमत सुमारे 3 हजार 310 रुपये होती.
याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. संगेवार यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. संशयितांकडे आरोग्य विभाग तसेच महापालिकेचं कोणतंही प्रमाणपत्र किंवा आरोग्य तपासणीसाठी आवश्यक पदवी नसल्याचं निष्पन्न झाले. मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल, असं कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.