लोकलचा पास काढण्यासाठी आता UTS वापरता येणार नाही
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यूटीएस ॲपवरून आधी काढलेले मासिक पास त्यांचा कालावधी संपेपर्यंत वैध राहणार आहेत. मात्र, नवीन पास काढण्यासाठी यूटीएस ॲपचा पर्याय उपलब्ध नसेल. त्यामुळे प्रवाशांनी पुढील प्रवासासाठी रेल वन ॲप डाऊनलोड करून वापरणे आवश्यक आहे.
पुढे काय कराल?
रेल्वेच्या सर्व डिजिटल सुविधा एकाच ॲपवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रेल वन ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपवरून अनारक्षित तिकिटे, मासिक पास, पेमेंट सुविधा आणि इतर अनेक सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करण्याची गरज भासणार नाही.
advertisement
प्रवाशांना मिळणार विशेष सवलत
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक विशेष सवलत जाहीर केली आहे. रेल वन ॲपवरून अनारक्षित तिकीट खरेदी केल्यास प्रवाशांना 3 टक्के सूट मिळणार आहे. ही सवलत 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीसाठी लागू असणार आहे.
दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे रेल वन ॲपचा वापर वाढल्यास तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळेत नवीन अॅपचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
