गुळाच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2812 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली बाजारात 1243 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 590 क्विंटल गुळास 5450 रुपये सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याची आवक कमीच
राज्याच्या मार्केटमध्ये आज 103 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 48 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 18000 ते 22000 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल शेवग्यास 23500 रुपयांपर्यंत सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
काळी द्राक्षे खावीत की हिरवी? आरोग्यासाठी कोणती चांगली? खरं कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का Video
डाळिंबाची आवक दबावातच
आज राज्याच्या मार्केटमध्ये 988 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 676 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई बाजारात राहिली. त्यास सर्वसाधारण 14000 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 66 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 800 ते 20000 रुपयांपर्यंत सर्वाधिक बाजारभाव मिळाला. यासह हळदीचे मार्केटदेखील तेजीत असून आज 23000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





