advertisement

हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
Krushi

Krushi Market 

मुंबई: गुरुवार, दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गूळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
गुळाच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2812 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली बाजारात 1243 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 590 क्विंटल गुळास 5450 रुपये सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याची आवक कमीच
राज्याच्या मार्केटमध्ये आज 103 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 48 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 18000 ते 22000 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल शेवग्यास 23500 रुपयांपर्यंत सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाची आवक दबावातच
आज राज्याच्या मार्केटमध्ये 988 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 676 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई बाजारात राहिली. त्यास सर्वसाधारण 14000 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 66 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 800 ते 20000 रुपयांपर्यंत सर्वाधिक बाजारभाव मिळाला. यासह हळदीचे मार्केटदेखील तेजीत असून आज 23000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement