याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे स्टेशनमध्ये टेरेस पार्किंग, शटल सेवा स्टेशन, व्यापारी गाळे यासह तीन प्लॅटफॉर्म असणार आहेत. एक अत्याधुनिक रेल्वे स्टेशन म्हणून याचा विकास करण्यात आला आहे. त्यामुळे हे स्टेशन लोकल सेवेतील एक महत्त्वाचं लँडमार्क ठरणार आहे.
Mumbai: विक्रोळी-भांडुपसह मुलुंड जाणार पाण्याखाली! पर्यावरणवाद्यांच्या भीतीचं कारण काय?
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर या रेल्वे स्टेशनवर लोकलला थांबा दिला जाणार आहे. 112 कोटी रुपये खर्च करून सीआयडी कोचची उभारणी करण्यात आली आहे. 270 मीटर लांब आणि 13 मीटर रुंदीचे तीन प्लॅट फॉर्म बांधण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी पार्किंग व्यवस्था आहे. बस, कार, ऑटो यांचा स्वतंत्र ड्रॉप झोन आहे. त्यामुळे सर्व रेल्वे स्टेशन्सपैकी हे स्टेशन सर्वच बाबतीत सरस असणार आहे. स्टेशनचं एकूण क्षेत्रफळ 16, 600 चौरस मीटर आहे.
advertisement
रेल्वे स्टेशनचा पहिला टप्पा रेल्वेच्या सोयींवर आधारित आहे. पुढील टप्प्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर टाऊनशिप वाढवल्यानंतर रिटेल आणि लेझर झोन तयार होईल. विमातळाकडे तोंड असलेली बाजू शटल बस सेवेसाठी वापरली जाणार आहे. या स्टेशनमध्ये कोअर एरिया, ट्रान्झिशन एरिया, पेरीफेरल एरिया आणि प्रशासकीय कार्यालयांची जागा अशा चार विभाग असणार आहेत. याशिवाय, सुलभ स्वच्छतागृहे, सब वे द्वारे सर्व भाग जोडला जाईल. ही पे अँड पार्क स्वरुपात पार्किंग सुविधाही उपलब्ध असणार आहे.