Mumbai: विक्रोळी-भांडुपसह मुलुंड जाणार पाण्याखाली! पर्यावरणवाद्यांच्या भीतीचं कारण काय?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai: पुढील वर्षीच्या पावसाळ्यात मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी हा भाग पाण्याखाली जाईल, अशी चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई: महानगरी मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी जागेची गरज भासत आहे. मात्र, लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात जागेची वाढ होणं शक्य नाही. त्यामुळे आता खारफुटीची जंगलं, खाड्या आणि मिठागरांमध्ये मातीचा भराव टाकून जागेची निर्मिती केली जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केल्यास मुंबईच्या भविष्यासाठी ही बाब अत्यंत धोकादायक आहे. माणसाने निसर्गावर अतिक्रमण करत राहिल्यास पुढील काळात काही उपनगर पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ईस्टर्न एक्सप्रेसवे जवळील मिठागरांच्या जमिनींवर लोकांना राहण्यासाठी वसाहती उभारण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत. असं झाल्यास पुढील वर्षीच्या पावसाळ्यात मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी हा भाग पाण्याखाली जाईल, अशी चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड ते विक्रोळी हा परिसर सखल भागात आहे. पावसाळ्यात या भागातील पाणी महामार्गाजवळील मिठागरांच्या जमिनीतून समुद्रापर्यंत जाते. भरतीच्या वेळी वाढलेलं पाणी देखील मिठागरांच्या जमिनीवर साचते.
advertisement
मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतील हजारो कुटुंबं लहान टेकड्यांवर राहतात. त्यांना भाड्याने घरं देण्याच्या योजनेअंतर्गत आता मिठागरांच्या जमिनींवर बांधकाम करण्याची योजना आखली जात आहे. मुलुंड, भांडुप आणि कांजूरमार्गजवळील रिकाम्या मिठागरांच्या जमिनींवर ही घरं बांधली जातील. परिणामी पाणी समुद्रात जाण्याचे मार्ग बंद होतील आणि लोकांच्या घरात पाणी शिरेल.
advertisement
पर्यावरणवाद्यांनी मते, मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम केल्यास भविष्यात पाणी साचण्याची समस्या कित्येक पटींनी वाढेल. कोणत्याही योजनांच्या नावाखाली सरकार फक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधत आहेत. मात्र, या सर्व प्रक्रियेत निसर्गाच्या चक्रात अडथळे निर्माण होत आहे. त्याचे भविष्यात भयंकर परिणाम सहन करावे लागतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai: विक्रोळी-भांडुपसह मुलुंड जाणार पाण्याखाली! पर्यावरणवाद्यांच्या भीतीचं कारण काय?