TRENDING:

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी वर्ष भरापूर्वी डाव टाकला; आज पवारांभोवती वेढा पडला!

Last Updated:

राज्यात यंदाची लोकसभा निवडणूक ही दोन पक्षांमध्ये न होता दोन नेत्यांमध्ये लढली जात असल्याचं चित्र आहे. होय तुम्ही बरोबर ओळखलंत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असा सामना रंगला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल झोरी, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई : राज्यात यंदाची लोकसभा निवडणूक ही दोन पक्षांमध्ये न होता दोन नेत्यांमध्ये लढली जात असल्याचं चित्र आहे. होय तुम्ही बरोबर ओळखलंत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असा सामना रंगला आहे. महाविकास आघाडीचे जनक अशी शरद पवारांची ओळख आहे. तर महायुती सरकारचे निर्माते असं बिरुद फडणवीसांना लागतं. राज्यात याच महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये लढत आहे. 48 लोकसभांच्या या राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. शरद पवार गटाचं राजकीय अस्तित्त्व या लोकसभा मतदारसंघावर अवलंबून आहे. पवारांच्या या बालेकिल्ल्याला भेदण्याच्या प्रयत्नात महायुती करत आहे. हे करताना फडणवीसांनी मोठी खेळी केलीये. फडणवीसांनी बारामतीला वेढा घालत पवारांनाच आत कैद केलंय. यामुळं बारामतीचा गड वाचवण्याच्या नादात पवार पश्चिम महाराष्ट्रातलं साम्राज्य गमावू शकतात.

advertisement

दादांना महायुतीत खेचलं

लोकसभा निवडणूकांच्या वर्षभरापुर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण बारामती दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी मोठं विधान केलं होतं. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या 72 लोकसभांवर भाजपची करडी नजर होती. इथं विजय निश्चित करण्यासाठी भाजपने कंबर कसली. याची पुर्ण जबाबदारी फडणवीसांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. बारामतीत पवारांना कैद केलं तर पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवण्याची संधी फडणवीसांनी हेरली. या क्रमात ते तगड्या उमेदवाराच्या शोधात होते. विरोधी बाकावर असातना अजित पवार भाजपवर टीकेच्या तोफा डागायचे. सभागृहाबाहेर आले की डोळा मारायचे. हा डोळा त्यांनी कुणाला मारला होता याचं उत्तर जुलै 2023 ला मिळालं. अजित पवार महायुतीत सामील झाले. फडणवीसांनी ही योजना बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आखल्याचं बोललं गेलं.

advertisement

डॅमेज कंट्रोल

अजित पवार महायुती सामली झाल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला होता. सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा सुरु झाली. त्या सर्वांची मनधरणी करण्याचं काम फडणवीसांनी केलं. शिंदे गटातील अनेक आमदारांच्या मंत्रीपदाला कात्री लागली. अर्थ मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं त्यांनी अजित दादांना दिलं. शिवाय चंद्रकांत दादांसारख्या महत्त्वाच्या नेत्याकडून पुण्याचं पालकमंत्री पद काढून घेतलं. या सर्वांची नाराजी फडणवीसांनी पत्करली. हे सर्व करण्यामागंही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विजयाकडेच त्यांचं लक्ष होतं. फडणवीसांच्या या प्रयत्नांचं फळ शेवटी मिळालंच. अजित पवारांसारखा बलाढ्य नेता व सुनेत्रा वहिनींसारखा पवार कुटुंबीयांमधील उमेदवार महायुतीत आला. यामुळे बारामतीचा प्रचार गांभीर्याने न घेणारे शरद पवार पायाला भिंगरी लावून धावत आहेत. बारामतीत सुळे आणि कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं, पवारांनी राज्यभरात आघाडीचं काम करायचं. ही प्रथा खंडीत करण्यात आणि पवारांना फक्त बारामती पुरतं मर्यादित ठेवण्यात फडणवीस यशस्वी ठरलेत.

advertisement

बारामती का महत्त्वाची?

बारामती लोकसभा मतदारसंघांच्या सीमा लक्षात घेतला की त्याचं महत्त्व लक्षात येतं. बारामतीला लागून पुणे, सातारा, माढा, सोलापूर असे महत्त्वाचे मतदारसंघ आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं एकूण राजकारण या मतदारसंघामधून चालतं. शिवाय साखर पट्ट्याचा भागही यात येतो. पवारांचं प्रभाव क्षेत्र म्हणून याकडे पाहिलं जातं. भाजपने मोठी ताकद लावून तिथं शिरकाव केला होता. यावेळी भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. पवार यात खोडा घालण्याची ताकद ठेवून आहेत याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळे भाजपला पवारांना पवारांच्या प्रभाव क्षेत्रापासून दुर ठेवायचं आहे. हे करताना बारामती लोकसभा मतदारसंघही जिंकायचा आहे. इथं सुप्रिया सुळेंचा पराभव मोठा राजकीय संदेश देवू शकतो. शरद पवार गटाचं मनोबल या पराभवामुळं खचू शकतं. काहीच महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पवार गटाला कमजोर करण्याची एकही संधी भाजपला सोडायची नाही. बारामतीत महायुतीचा विजय विधानसभेचा मार्ग सुकर करु शकतो.

advertisement

पवार बॅकफुटवर

फडणवीसांनी पवारांना बॅकफुटला ढकलल्याचं पहायला मिळतंय. पिढ्या न पिढ्याचं राजकीय वैर पवारांनी विसरलं. प्रत्येक नेत्याच्या घरी पवार भेट देतायेत. यामध्ये थोपटे आणि काकडे कुटुंबीयांचा समावेश आहे. पवार राजकीय यशाच्या शिखरावर असताना या नेत्यांकडे पाहत ही नव्हते. फडणवीसांच्या व्युहनितीमुळे पवारांवर या नेत्यांची मनधरणी करण्याची वेळ आली असल्याचं बोललं जातंय. सुप्रिया सुळेंना ही निवडणूक जड जाणार असल्याचं यातून अधोरेखित होतं आहे. फडणवीसांच्या मास्टर प्लॅनमुळं पवारांच्या पत्नीही मैदानात उतरल्या आहेत. प्रतिभा पवार या ही प्रचारात दिसत आहे. 1990 नंतर त्या प्रचार करताना दिसत नव्हत्या. त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलं आहे. पवारांचा पूर्ण फोकस हा बारामतीत आहे. उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं मर्यादित लक्ष आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी पवारांची अनुस्थिती फायद्याची ठरु शकते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी वर्ष भरापूर्वी डाव टाकला; आज पवारांभोवती वेढा पडला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल