अर्चना नाईक असं हत्या झालेल्या ३६ वर्षीय महिलेचं नाव आहे. तर दत्ताराम पिंगळा असं आरोपी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी दत्ताराम विरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हत्येची ही घटना घडल्यानंतर रेवदंडा पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अर्चना नाईक (३६) आणि आरोपी दत्ताराम पिंगळा यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. मात्र, अर्चनाच्या काकांनी या नात्याला विरोध केला. त्यांनी अर्चनाचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून दिला. या रागातून दत्तारामने अर्चनाच्या काकांची हत्या केली. त्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला तुरुंगवास देखील झाला.
advertisement
काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटल्यानंतर दत्ताराम अर्चनाला भेटण्यासाठी तिच्या आईच्या घरी गेला. त्याने पुन्हा अर्चनाला रिलेशनशिपमध्ये येण्याबाबत विचारणा केली. पण तिचं लग्न झाल्यामुळे या गोष्टी शक्य नव्हत्या. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद वाढत गेल्यानंतर दत्तारामने दोरीने गळा आवळून अर्चनाची हत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. अर्चनाची बहीण दर्शना नाईक यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी दत्ताराम पिंगळाला अटक केली असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.