TRENDING:

इराण युद्धाचा चटका आता पोटाला! गॅस तुटवड्यानंतर कोळसाही महाग, किलोमागे इतक्या रुपयांची वाढ

Last Updated:

आखाती युद्धामुळे एलपीजी तुटवडा, गॅस महागल्याने लोक कोळशाकडे वळले पण कोळशाचे दर किलोमागे १२ ते १५ रुपयांनी वाढले, हॉटेल उद्योग आणि मध्यमवर्गीय संकटात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आखातात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम भातावर हळूहळू तीव्र होत आहेत. भारताच्या इंधन बाजाराला मोठा फटका बसला आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त झालेले लोक पर्यायी इंधन म्हणून चूल, इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगडी आणि कोळशाकडे वळत आहेत. रॉकेल 120-130 रुपये लीटर असल्याने परवडणारे नाही त्यामुळे कोळशावर शिफ्ट होण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे.
कोळसा
कोळसा
advertisement

गॅस गायब, आता कोळशावर भिस्त

हे सगळं असताना आता कोळसा देखील महाग झाला आहे. बाजारपेठेत कोळशाच्या दरात तब्बल १२०० रुपयांची मोठी वाढ झाली असून, किरकोळ विक्रीमध्ये किलोमागे १२ ते १५ रुपयांची वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. आखाती देशांतील तणावामुळे एलपीजी पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी आपले गॅस शेगड्यांचे बर्नर बंद करून पुन्हा जुन्या 'कोळशाच्या भट्ट्या' पेटवण्यास सुरुवात केली.

advertisement

ऑर्डर देऊनही आठवडाभर वेटिंग

इतकंच नाही, तर मध्यमवर्गीय कुटुंबांनीही गॅस वाचवण्यासाठी कोळशाच्या छोट्या चुलींचा वापर सुरू केला आहे. मागणीत अचानक झालेल्या या प्रचंड वाढीमुळे बाजारपेठेत कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे.सध्या परिस्थिती अशी आहे की, खिशात पैसे असूनही कोळसा सहजासहजी मिळत नाहीये. कोळसा विक्रेत्यांच्या मते, "आज ऑर्डर दिली तर कोळसा मिळण्यासाठी किमान आठ दिवसांचा काळ लागत आहे." माल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने छोटे विक्रेते हतबल झाले आहेत. ज्यांनी आगाऊ साठा करून ठेवला होता, ते आता वाढीव दराने विक्री करत असल्याचे चित्र दिसत आहे.

advertisement

हॉटेल व्यावसायिक संकटात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षे उद्योगात क्रांती होणार, पुणेकर शास्त्रज्ञांचा खास शोध, कसा आणि कुणाला फायदा? Video
सर्व पहा

घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल उद्योगाला याचा मोठा फटका बसला आहे. कोळसा महागल्याने तंदूर आणि भट्टीवर चालणाऱ्या पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. "गॅस परवडत नाही म्हणून कोळशाकडे आलो, तर आता तिथेही भाव गगनाला भिडलेत. व्यवसाय करायचा कसा?" असा उद्विग्न सवाल एका हॉटेल मालकाने विचारला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इराण युद्धाचा चटका आता पोटाला! गॅस तुटवड्यानंतर कोळसाही महाग, किलोमागे इतक्या रुपयांची वाढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल