पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची ३८ वर्षीय आरोपीसोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे संबंध सुरू असताना आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य केले. त्याने महिलेसोबतचे शारीरिक संबंधांचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले, तसेच तिचे फोटोही काढले.
या छायाचित्रांचा आणि व्हिडीओचा वापर करून आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेनं निमूटपणे आरोपीचे अत्याचार सहन केले.
advertisement
या अडीच वर्षांच्या काळात आरोपीने पीडितेच्या गोरेगाव येथील राहत्या घरी आणि मुंबईतील विक्रोळी येथील स्वतःच्या निवासस्थानीही तिच्यावर अत्याचार केले. मानसिक आणि शारीरिक यातना सहन अडीच वर्ष तणावाखाली जीवन जगल्यानंतर, अखेर महिलेने हिंमत दाखवून महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ ३८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे महाड तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, महाड शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
