महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहेत. शुक्रवारी राज्यातील दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यापासून गेल्या वर्षभरात बदल्यांचा धडाका सुरू आहे. प्रत्येक १०-१५ दिवसाला सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. बदल्यांच्या धडाक्याची परंपरा या आठवड्यात देखील अबाधित आहे.
advertisement
कोणकोणत्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या?
राजेश नार्वेकर (IAS:SCS: 2009 ) यांची मुंबई येथील परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
समीर कुरतकोटी (IAS:SCS:2013) यांची मुंबई येथील शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत राजेश नार्वेकर?
राजेश नार्वेकर हे सनदी अधिकारी तसेत संजय राऊत यांचे व्याही आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे . तसेच रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. या दरम्यान ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास या योजना प्रभावीपणे राबवणारे अधिकारी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.२०१८ मध्ये राजेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.
