हंगामी अध्यक्षपदी भाजपच्या कालिदास कोंळबकर यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांची घोषणा ९ डिसेंबरला होणार आहे. तर हंगामी अध्यक्ष २८८ आमदारांना शपथ देणार आहेत. यावेळी विधानसभेत ७८ नवे आमदार आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांचा आज शपथविधी होणार नाही. विरोधी पक्षाचे आमदार ईव्हीएमचा निषेध नोंदवणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शपथ घेतली नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला.
advertisement
विधानभवनात जाण्याआधी पायऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला.
विरोधी बाकांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अगदी समोरच्या बाकांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव बसले आहेत. तर सभागृहात कॅाग्रेस आणि NCP SP पक्षांच्या आमदारांची अनुपस्थिति आहे. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील हे सभागृहात उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटील यांचं अभिनंदन केलं.