विधिमंडळ सचिवालयाकडून शपथविधीचा क्रम आता जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार भाजपच्या चैनसुख संचेतींना पहिल्या क्रमांकावर शपथ देण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाचव्या क्रमांकावर शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे सहाव्या तर अजित पवार सातव्या क्रमांकावर शपथ घेणार आहेत.
दरम्यान कालच नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्याकरिता राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. त्यामुळे 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
advertisement

विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या 78 नव्या आमदारांचा आज पहिल्यांदा शपविधी होणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपचे 33, शिवसेना एकनाथ शिंदे यांचे 14, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8, शिवसेना उद्धव ठाकरे 10, काँग्रेस 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे.