शपथविधीआधी मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून बोलताना अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्हाला तुम्हाला पाच वर्षे ताटकळ ठेवायचं नाही आहे. सगळ्यांना मंत्रिमंडळ सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे मर्यादित संधी आहेत. अशात आम्ही अडीच अडीच वर्षे संधी देण्याचा ठरवला आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान याआधी एकनाथ देखील मंत्र्यांसाठी अडिच अडिच वर्षाचा फॉर्म्युला वापरण्याची चर्चा आहे. कारण अनेक नेत्यांना मंत्रिपदाचे वेध आहे. त्यामुळे सर्वांना संधी देता येणार नाही. त्यामुळे नेत्यांची नाराजी दुर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी अडिच अडिच वर्षाचे मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यासोबत आज शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडून अडिच-अडिच वर्षाचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
दरम्यान अजित पवार यांनी पुढे बोलताना तुफान फटकेबाजी केली.अजित पवार म्हणाले की, निवडणुकीत अनेक बदल केले. यापैकी स्वतःमध्ये काही बदल केले.थोडं हसायला सुरुवात केली, घरातून निघतानाच ठरवून यायचं की आज कुणावर चिडायचं नाही चेहरा हसरा ठेवण्याचा. तसेच महामंडळाचे अध्यक्ष आणि महामंडळाच्या समित्यांचा निर्णय देखील या दोन-तीन महिन्यातच आम्हाला संपवायचा, असे अजित पवारांनी सांगितले.
>> मंत्रिमंडळात अजित पवारांचे कोणते शिलेदार?
> आदिती तटकरे
> बाबासाहेब पाटील
> दत्तात्रय भरणे
> हसन मुश्रीफ
> नरहरी झिरवाळ
> अनिल पाटील
> इंद्रनील नाईक
> सना मलिक
