खरं तर आझाद मैदानावर आज फक्त तीन नेत्यांचाच शपथविधी पार पडणार आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांनी होणार आहे.यात शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार हा 11 डिसेंबर 2024 ला होणार आहे. असाच दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी देखील केला आहे.
advertisement
आज तिघांचा शपथविधी होईल. पुढच्या दोन दिवसांत 7 आणि 8 डिसेंबरला आमदारांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर अधिवेशनाआधी इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. तसेच कोणते मंत्री शपथ घेणार नाही हेच ठरल्यामुळे खातेवाटप हा पुढचा विषय आहे, असे अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
आज फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पंतप्रधानांचा वेळ थोडा कमी मिळाल्याने तिघाचा शपथविधी होईल. तसेच कोणाला किती खाती मिळतील याबाबत चर्चा होईल. योग्य खाती शिंदेसाहेब पक्षाकडे घेतील
प्रत्येक पक्ष आप आपल्या परिने मागणी करतो. त्यामुळे शिंदेसाहेबांनी जे मागितलयं त्यावर दुपारपर्यंत निर्णय होईल. काही गोष्ट भविष्यात चांगल्या करण्यासाठी काही निर्णय सावकाश घेतले जातात, अशे गोगावलेंनी सांगितले.
