उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी आणि झिरो व्हिजिबिलिटी असलेल्या धुक्याने थैमान घातले आहे. मध्य प्रदेशात धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचे थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावरही दिसून येत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात मात्र अचानक भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
2026 नव्या वर्षाच्या स्वागतालाच मुसळधार पावसानं तुफान बॅटिंग केली आहे. महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत तापमानात मोठा बदल होणार नाही. मात्र, त्यानंतर उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढेल. विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात २ ते ४ अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मुंबईत मुंबईसह किनारपट्टीच्या भागात हवामान आल्हाददायक राहील, मात्र रात्रीच्या वेळी गारवा जाणवेल.
पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडे आता त्याच रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात तर होत नाही ना ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे उत्तरेतही थंड वारे वाहात आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भ मराठवाड्यात कडाक्याची थंडी राहणार आहे. मुंबईत आणि पालघरमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
कोकणातही काही भागांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे पावसाचे ढग उत्तर महाराष्ट्रापर्यंत पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांनी काळजी घ्यावी. आंबा-काजूला आलेला मोहोर या पावसामुळे धुवून निघण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलं आहे.
