बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी निकालाची उत्सुकता असते. मात्र, अनेकदा गडबडीत किंवा अन्य कारणांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर आठवत नाही किंवा हरवतो. अशा वेळी मग निकाल कसा पाहायचा, याची चिंता लागून राहते. पण काळजी करण्याची गरज नाही! सीट नंबर विसरला असला तरी, निकाल पाहण्यासाठी काही सोपे पर्याय उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना सीट नंबरशिवाय निकाल पाहण्याची सुविधा पुरवते. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. महाविद्यालयाकडून त्यांच्या लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सीट नंबर शोधून देऊ शकतात.
advertisement
याव्यतिरिक्त, काही शैक्षणिक संकेतस्थळे (वेबसाइट्स) विद्यार्थ्यांचे नाव आणि इतर काही मूलभूत माहितीच्या आधारे निकाल शोधण्याची सुविधा देतात. जरी ही अधिकृत पद्धत नसली तरी, अनेक विद्यार्थी या पर्यायाचा वापर करतात. मात्र, अशा अनधिकृत संकेतस्थळांवर आपली वैयक्तिक माहिती भरताना विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचा फोन किंवा लॅपटॉप अकाउंट हॅक होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही महाविद्यालयाशी संपर्क करणे जास्त सोयीचं आणि सुरक्षित पर्याय आहे.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) निकाल पाहण्यासाठी सीट नंबर आवश्यक असतो. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर आठवत नसेल, त्यांनी त्वरित आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि तो मिळवावा. यामुळे निकाल पाहण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित होईल.
त्यामुळे, जर तुम्ही तुमचा बारावीचा सीट नंबर विसरला असाल, तर निराश होऊ नका. तुमच्या महाविद्यालयाच्या मदतीने किंवा अन्य उपलब्ध पर्यायांचा विचार करून तुम्ही तुमचा निकाल सहजपणे पाहू शकता. मात्र, शक्य असल्यास परीक्षेच्या हॉल तिकीटाची प्रत जपून ठेवावी, जेणेकरून ऐनवेळी कोणतीही अडचण येऊ नये.