राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरूच असून आज पुन्हा 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज बदल्या करण्यात आलेले सर्वाधिक अधिकारी पुणे आणि मुंबई शहरातील आहे. यामध्ये मुंबईचे अप्पर पोलिस आयुक्त अनिल पारसकर, पुणे शहराचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची बदली करण्यात आली आहे.
पंकज देशमुख यांची पुणे पोलीस अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती
advertisement
राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आत्तापर्यंत 27 ते 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून गृह खात्याने नोटिफिकेशन काढले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे पोलीस अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती तर पुणे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त म्हणून वर्णी करण्यात आली आहे.
Maharashtra Transfer List : कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
1. अनिल पारसकर- अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई.
2. शैलेश बलकवडे- अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई
3. एम. रामकुमार - संचालक,महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे (पद अवनत करुन)
4. शशीकुमार मीना- अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
5. प्रविण पाटील - अपर पोलीस आयुक्त,नागपूर
6. संजय बी. पाटील- अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर
7. वसंत परदेशी- अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर
8.एस.डी. आव्हाड- अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
9. एस. टी. राठोड - पोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
10. पी.पी. शेवाळे - पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई
11. ए.एच. चावरिया- पोलीस आयुक्त, अमरावती शहर (पद अवनत करुन)
12. विनिता साहु- अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई