या आकडेवारीनुसार, एका जागेसाठी सरासरी १०८ उमेदवार मैदानात उतरणार असल्याने भरती प्रक्रियेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांनी पोलीस दलात जाण्यासाठी मोठा उत्साह दाखवला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून आलेल्या अर्जांची संख्या लक्षणीय असून, पोलीस शिपाई पदासाठी सर्वाधिक स्पर्धा पाहायला मिळत आहे.
advertisement
शिपाई पदासाठी 12 हजार 702 जागा असून त्यासाठी ७ लाख ७६ हजारहून अधिक अर्ज आले आहेत. चालकासाठी ४७८ जागा असून १ लाख ८० हजार अर्ज आले आहेत. तर ब्रँडसाठी १९ जागा असून १७ हजार अर्ज आले आहेत. कारागृह शिपायासाठी ५५४ जागा असून ३ लाख ३४ हजार ३५० अर्ज आले आहेत. एसआरपीएफसाठी 1 हजार ६५२ जागा असून ३ लाख ३५ हजार अर्ज दाखल झाले आहेत.
भरती प्रक्रियेतील अर्जांची प्रचंड संख्या पाहता, काही गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने उमेदवारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहे. कोणत्याही एजंट किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या आमिषाला बळी पडून पैसे देऊ नका," असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
अर्ज प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष मैदानी चाचणीकडे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांची शारीरिक पात्रता आणि मैदानी चाचणी २० जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता उमेदवारांकडे सरावासाठी मोजकेच दिवस उरले असून, मैदाने तरुणांच्या सरावाने गजबजली आहेत.
