TRENDING:

आजचं हवामान: अरबी समुद्र खवळला, महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय मोठं संकट, ४८ तास कसं राहील हवामान?

Last Updated:

भारतीय हवामान विभागानुसार राज्यात थंडी वाढणार असून, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान ८ ते १० अंशांखाली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने खबरदारीचे आवाहन केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Weather Update: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा वेगाने बदल होत असून, येत्या काही दिवसांत थंडीचा जोर अधिक वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत राज्याच्या किमान तापमानात फारसा बदल होणार नसला, तरी त्यानंतरच्या पुढील ४ दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची मोठी घट होण्याचा अंदाज आहे. यामुळे जानेवारीच्या सुरुवातीलाच राज्याला थंडीचा कडाका सोसावा लागणार आहे.
News18
News18
advertisement

सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका

हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्ण अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. अरबी समुद्रात श्रीलंकेच्या दिशेकडून एक सायक्लोनिक सर्क्युलेशन पुढे सरकत आहे. या सगळ्यामुळे किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळू शकतो. राज्यातील काही भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहू शकतं. विशेषत: कोकण पट्ट्यात ढगाळ हवामान राहू शकतं.

advertisement

विदर्भ, मराठवाड्यात थंडीचा जोर अधिक

उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी असून तेथून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. यामुळे प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका तीव्र असेल. रात्री आणि पहाटेच्या सुमारास किमान तापमान ८ ते १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागेल.

advertisement

धुक्याचाही राहणार प्रभाव

तापमानात होणाऱ्या या घसरणीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सकाळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळू शकते. मुंबई आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही किमान तापमानात घट होईल, ज्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव येईल.

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवग्यानं भाव खाल्ला, सर्वाधिक दर कुठं? आले अन् डाळिंब बाजारातून मोठं अपडेट
सर्व पहा

थंडीचा कडाका वाढणार असल्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पहाटे आणि रात्री घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा, असेही हवामान तज्ज्ञांनी सुचवले आहे. तसेच, थंडीचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: अरबी समुद्र खवळला, महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय मोठं संकट, ४८ तास कसं राहील हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल