Pune News: कल्याणीनगरच्या 'त्या' आलिशान मसाज पार्लरचं काळं सत्य; आतला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील हायप्रोफाईल कल्याणीनगर परिसरात मसाज पार्लरच्या आड सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पुणे : पुण्यातील हायप्रोफाईल कल्याणीनगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मसाज पार्लरच्या व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. तिथून काही तरुणींची सुटकाही करण्यात आली आहे.
कल्याणीनगरमधील एका संकुलात मसाज सेंटरच्या आड अनैतिक प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तिथे छापा टाकला. यावेळी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोतीबर समसुलहक रेहमान (वय ३१, रा. विमाननगर) आणि अब्दुल मोनुउद्दीन आवाल (वय १९, रा. येरवडा) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
याप्रकरणी पोलीस अंमलदार बालाजी सोगे यांनी फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
advertisement
पुणे पोलिसांचा 'क्लीन अप' ड्राईव्ह: शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांत कोंढवा, बाणेर आणि कात्रज-मंतरवाडी भागातही अशाच प्रकारचे छापे टाकून अनेक रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. अवैध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 11:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: कल्याणीनगरच्या 'त्या' आलिशान मसाज पार्लरचं काळं सत्य; आतला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले









