टीकाकारांनो..! ट्रोलिंगवर सचिन पिळगांवकरांनी अखेर सोडलं मौन, बनवाबनवी न करता थेट मनातलं सांगितलं

Last Updated:
Sachin Pilgaonkar On Trolling : अभिनेते सचिन पिळगांवकर गेली वर्षभर ट्रोलर्सच्या हिटलिस्टवर होते. अखेर त्यांनी या सगळ्यावर मौन सोडलं. सचिन यांनी ट्रोलिंगवर भाष्य करत ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलंय.
1/9
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर गेली अनेक महिने सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. सतत ट्रोलर्सच्या हिटलिस्टवर असलेल्या पिळगांवकरांनी अखेर ट्रोलिंगवर मौन सोडलं आहे. 

advertisement
2/9
काही दिवसांआधी सचिन पिळगांवकरांनी मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिनं देखील वडिलांवर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं होतं. आम्हाला याची सवय आहे, ट्रोलिंगचा आमच्यावर काही फरक पडत नाही असं तिनं म्हटलं होतं. 

3/9
इतकंच नाही तर सचिन यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनीही ट्रोलिंगवर भाष्य करत ट्रोलर्सना झापलं होतं. सुप्रिया आणि श्रिया यांच्यानंतर सचिन पिळगांवकर यांनी ट्रोलिंगवर भाष्य करत त्यांच्या स्टाइलनं उत्तर दिलं आहे. 

4/9
सचिन पिळगांवकर अनेक महिन्यांनी पुन्हा टेलिव्हिजनवर दिसणार आहेत. 'मी होणार सुपरस्टार छोटे उत्साद'च्या नव्या पर्वात ते परिक्षक असणार आहे. यानिमित्तानं मुंबई टाइम्सशी बोलताना सचिन पिळगांवकरांनी ट्रोलिंगवर भाष्य केलं. 

5/9
सचिन पिळगांवकर म्हणाले,
सचिन पिळगांवकर म्हणाले, "मुळात ट्रोल करणाऱ्यांना तुम्ही केलेलं काम माहिती नसेल तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही."
advertisement
6/9
 "करिअरच्या 62 व्या वर्षी मी त्यांना इतका महत्त्वाचा वाटत असेल, लोकप्रिय असेन तर आजवर मी जे काही कमावलं, ती परमेश्वराची कृपा आहे."

7/9
सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले,
सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, "कदाचित ट्रोलर्सना मी त्यांचा वयाचा वाटतो म्हणून ते टीका करतात. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याची मला जाणीव आहे. मी काम करत राहणार. टीकाकारांनो तुमचं भलं व्हावं, असा आशीर्वाद देईन."
advertisement
8/9
अभिनेते सचिन पिळगांवकरांनी ट्रोलर्सना उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. गेली अनेक महिने सुरू असलेल्या ट्रोलिंगवर सचिन पिळगांवकर यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते.

9/9
सचिन पिळगांवकरांवर होणाऱ्या ट्रोलिंगवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही भाष्य केलं होतं. अभिनेत्री क्रांती रेडकर, संतोष जुवेकर, पुष्कर जोग सारख्या कलाकारांनी अनेकदा सचिन यांची बाजू घेत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं होतं. 

KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement