आले आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 993 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 914 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3000 ते 4100 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 14 क्विंटल आल्यास 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Weather Alert: मुंबई ते नागपूर हवा बिघडली, कुठं थंडी तर कुठं अवकाळी संकट, सोमवारी अलर्ट
advertisement
शेवग्याची आवक कमीच
राज्याच्या मार्केटमध्ये आज 89 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 80 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 16500 ते 25000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 8 क्विंटल शेवग्यास प्रतीनुसार 10000 ते 28000 दरम्यान सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
डाळिंबाचे भाव
आज राज्याच्या मार्केटमध्ये 495 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 479 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 9700 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 15000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





