APMC Market: शेवग्यानं भाव खाल्ला, सर्वाधिक दर कुठं? आले अन् डाळिंब बाजारातून मोठं अपडेट

Last Updated:

APMC Market Rate: राज्यातील कृषी मार्केटमध्ये झालेली शेवगा, डाळिंब आणि आल्याची आवक आणि दर याबाबत अपडेट जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: शेवग्यानं भाव खाल्ला, सर्वाधिक दर कुठं? आले अन् डाळिंब बाजारातून मोठं अपडेट

मुंबई: गेल्या काही काळात हवामानातील बदलांमुळे राज्यातील कृषी मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी दिसत आहेत. रविवार, दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये कमी-अधिक प्रमाणात कृषी मालांची आवक झाली. यातील आले, शेवगा आणि डाळिंब या शेतमालाचे दर आणि आवक यांबाबत जाणून घेऊया.
आले आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 993 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 914 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3000 ते 4100 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 14 क्विंटल आल्यास 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
शेवग्याची आवक कमीच
राज्याच्या मार्केटमध्ये आज 89 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 80 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 16500 ते 25000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 8 क्विंटल शेवग्यास प्रतीनुसार 10000 ते 28000 दरम्यान सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
डाळिंबाचे भाव
आज राज्याच्या मार्केटमध्ये 495 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 479 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 9700 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 15000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: शेवग्यानं भाव खाल्ला, सर्वाधिक दर कुठं? आले अन् डाळिंब बाजारातून मोठं अपडेट
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement