Mutton : सुट्टीच्या दिवशी मटणवर ताव मारताय? मग 'या' 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका; अन्यथा शरीरात तयार होईल विष

Last Updated:
जेव्हा तुम्ही मटण खात असाल तेव्हा काही ठरावीक गोष्टी त्यासोबत खाणं टाळलं पाहिजे, पण ते का आणि कशासाठी टाळलं पाहिजे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
1/9
सुट्टीचा दिवस म्हणजे मांसाहारी लोकांसाठी मेजवानीच, म्हणून रविवारी बहुतांश घरात मच्छी, मटण किंवा चिकन असं काहीतरी नॉनवेज बेत असतोच. ताटात नॉनवेजचा रस्सा आणि सोबतीला गरमागरम भाकरी असेल तर काय विचारता? तुम्ही देखील त्यांपैकीच एक असाल तर एक गोष्ट लक्षपूर्वक जाणून घेणं गरजेचं आहे. खास करुन जेव्हा तुम्ही मटण खात असाल तेव्हा काही ठरावीक गोष्टी त्यासोबत खाणं टाळलं पाहिजे, पण ते का आणि कशासाठी टाळलं पाहिजे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

advertisement
2/9
अनेक घरांमध्ये रविवारची सुरुवातच मुळी 'आज काय मटण की चिकन?' या प्रश्नाने होते. गृहिणींपासून ते घरातील लहानांपर्यंत सगळेच मोठ्या आवडीने मटणाचे विविध पदार्थ खातात. पण मटण हे पचायला जड आणि उष्ण प्रकृतीचे असते. अनेकदा मटण खाल्ल्यानंतर आपल्याला सुस्ती येते किंवा अपचनाचा त्रास होतो. याचे मुख्य कारण म्हणजे मटण खाल्ल्यानंतर आपण घेत असलेले चुकीचे पदार्थ.

3/9
आयुर्वेद आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मटण खाल्ल्यानंतर काही ठराविक गोष्टींचे सेवन करणे शरीरासाठी 'विषारी' ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया, आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेमकी कोणती खबरदारी घ्यावी.

4/9
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (Dairy Products)मटण किंवा चिकन खाल्ल्यानंतर लगेच दूध किंवा दुधाचे पदार्थ (लस्सी, आईस्क्रिम) खेणं ही सर्वात मोठी चूक आहे. यामुळे त्वचेचे विकार आणि पचनाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. केवळ दूधच नाही, तर दही किंवा ताक पिणे देखील टाळले पाहिजे. जर तुम्हाला पचन सुधारण्यासाठी काही हवे असेल, तर मिरी घालून बनवलेले गरम 'रसम' पिणे कधीही उत्तम.

5/9
मधाचे सेवन टाळा (Honey)मटण खाल्ल्याने शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण होते. मधदेखील उष्ण प्रकृतीचा असतो. जेव्हा तुम्ही मटण आणि मध यांचे एकत्र सेवन करता, तेव्हा शरीरातील उष्णता प्रमाणाबाहेर वाढते, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

6/9
'टी-टाईम'ला थोडा ब्रेक द्याअनेकांना जेवण झाल्या झाल्या चहा पिण्याची सवय असते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी उशिरा जेवण झाल्यावर 'आता संध्याकाळ झालीच आहे' म्हणून चहा घेतला जातो. पण मटण खाल्ल्यानंतर चहा पिणे म्हणजे छातीत जळजळ आणि अपचनाला आमंत्रण देणे होय. हे एक 'खतरनाक कॉम्बिनेशन' मानले जाते.

7/9
केळी आणि लवकर पचणारे पदार्थमटण पचायला खूप वेळ लागतो. अशा वेळी केळीसारखे लवकर पचणारे फळ खाल्ल्यास पोटात गॅस होणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे (Bloating) अशा समस्या निर्माण होतात. जेवणानंतर लगेच गोड किंवा खूप तिखट खाणे देखील टाळावे, कारण यामुळे तुम्हाला प्रचंड सुस्ती येऊ शकते.

8/9
रात्री मटण खाणे टाळामटण पचण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे ते नेहमी दुपारी खाणे योग्य ठरते. जर तुम्ही रात्री मटण खाणार असाल, तर झोपण्यापूर्वी किमान 3-4 तास आधी जेवण करा आणि थोडा वेळ शतपावली नक्की करा.

9/9
मटण खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्या. जर तुम्हाला पोट जड वाटत असेल, तर संध्याकाळी कोमट पाण्यात मेथी दाणे किंवा आल्याचा चहा घेणे फायदेशीर ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोट पूर्ण गच्च भरेपर्यंत मटण खाऊ नका; पोटाचा काही भाग भाज्या आणि पाण्यासाठी रिकामा ठेवा.

US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement