Car AC कोणत्या नंबरवर चालवल्याने मिळतं चांगलं मायलेज? लगेच करा चेक, वाचतील पैसे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळ्यात कार चालवताना एसी हा खुप गरजेचा असतो. कारण प्रचंड उन्हामुळे आपली गाडी ही तापत असते. मात्र एसीचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या पैशांचीही बचत होऊ शकते.
उन्हाळा सुरू होताच कारमध्ये एसी वापरणं हे अत्यंत गरजेचं होतं. कारण एसीचा वापर केल्याने कारमध्ये गारवा निर्माण होतो. बाहेरील तापमानाची आत जाणीव होत नाही. पण एसीचा वापर केल्याने मायलेजवर नक्कीच परिणाम होत असतो. कारण एसी थेट इंजिनमधून पॉवर घेत असतो. ज्यामुळे इंजिनवर अधीकचा दबाव येतो आणि फ्यूल जास्त खर्च होते.
advertisement
advertisement
advertisement
एसी 1 किंवा 2 नंबरवर चालवणे ही बेस्ट पद्धत आहे. या स्पीडवर कारचे केबिन हळुहळू गार होते आणि इंजनवर जास्त दबाव पडत नाही. यामुळे मायलेजही चांगलं मिळतं. तुमच्या कारमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल असेल तर तापमान 24 ते 26 डिग्रीच्या जवळपास ठेवणं योग्य मानलं जातं. यामुळे एसीला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि फ्यूलची बचत होते.
advertisement
advertisement
एसीचा वापर करताना रीसर्कुलेशन मोडचा वापर करणंही फायदेशीर असते. यामुळे गार हवा वारंवार आत घुमते आणि केबिन लवकर गार होते. सोबतच जास्त उष्णता नसेल तेव्हा फक्त ब्लोअरचा वापर करणं बेस्ट ठरतं. वेळोवेळी एसीची सर्व्हिस करणेही गरजेचे आहे. यामुळे कूलिंग चांगली राहते आणि इंजिनवर एक्स्ट्रा दबाव पडत नाही. ज्यामुळे मायलेज चांगलं राहतं.










