Vande Bharat : तारीख ठरली! 'या' दिवशी धावणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; तिकीट किती, थांबा कुठे?

Last Updated:
Vande Bharat Sleeper : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच कोलकाता ते गुवाहाटी मार्गावर धावणार आहे. आधुनिक सुविधा, वातानुकूलित कोच आणि परवडणारे तिकीट दर यामुळे ही ट्रेन प्रवाशांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.
1/7
वंदे भारत ट्रेनची नवी आणि अधिक आरामदायी नवीन सेवा म्हणजे वंदे भारत स्लीपर ट्रेन. ही ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

advertisement
2/7
ही ट्रेन खास लांब पल्ल्याच्या आणि रात्रीच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या स्लीपर ट्रेनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

3/7
मंगळवारी रेल्वे मंत्र्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा स्पीड ट्रायलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ट्रेनचा वेग आणि चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांनी या ट्रेनच्या सुविधा, तिकीट दर आणि सुरू होण्याची तारीख जाहीर केली.

4/7
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कोलकाता ते गुवाहाटी मार्गावर सुरू होणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. येत्या 15 ते 20 दिवसांत ही ट्रेन या मार्गावर सुरू होणार आहे

5/7
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही पूर्णपणे वातानुकूलित आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 कोच असतील. त्यामध्ये 13 एसी 3-टायर, 4 एसी 2-टायर आणि 1 एसी फर्स्ट क्लास कोच असेल. या ट्रेनमधून एकूण 823 प्रवासी प्रवास करू शकतील. सध्या या ट्रेनचे दोन संच तयार असून त्यांची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे.

6/7
रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की पुढील सहा महिन्यांत 8 नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केल्या जातील तसेच वर्षाअखेरीस ही संख्या 12 पर्यंत वाढवण्याचा रेल्वेचा निर्णय आहे.

7/7
कोलकाता-गुवाहाटी मार्गावरील या स्लीपर ट्रेनचे भाडे 2,300 रुपयांपासून सुरू होईल. एसी 3-टायरचे भाडे 2,300 रुपये, एसी 2 चे भाडे 3,000 रुपये आणि एसी 1चे भाडे 3,600 रुपये असणार आहे. विशेष म्हणजे या भाड्यात जेवणाची सुविधा देखील समाविष्ट आहे.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement