अश्रूंचा बदला अश्रूनेच घेणार, चार दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या अजितदादांच्या पठ्ठ्याचा चंद्रकांतदादांना इशारा

Last Updated:

भारतीय जनता पक्षाने युवा नेते अमोल बालवडकर यांचे ऐनवेळी तिकीट कापले. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी भाजपविरोधात थेटपणे मोर्चा उघडला आहे.

अजित पवार-चंद्रकांत पाटील-अमोल बालवडकर
अजित पवार-चंद्रकांत पाटील-अमोल बालवडकर
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पुणे : ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्याही डोळ्यात राहिलेल्या चार वर्षात अश्रू आणून बदला घेईन, असा थेट इशारा नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकात पाटील यांना दिला आहे. एका दादाने दीड वर्ष माझ्या विरोधात कट कारस्थान केले तर दुसऱ्या दादाने दीड तासात माझा राजकीय पुनर्जन्म केला, असेही बालवडकर म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने युवा नेते अमोल बालवडकर यांचे ऐनवेळी तिकीट कापले. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी भाजपविरोधात थेटपणे मोर्चा उघडला आहे. अजित पवार यांनीही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहरातील पहिली सभा अमोल बालवडकर यांच्यासाठी घेऊन त्यांना ताकद देत असल्याचे थेटपणे दाखवून दिले.

अश्रूंचा बदला मी अश्रूंनेच घेईन, बालवडकरांचा चंद्रकांतदादांना इशारा

advertisement
अमोल बालवडकर म्हणाले, कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी मागितली म्हणून माझ्यावर राग ठेवून माझी महापालिकेची उमेदवारी कापण्यात आली. तिकीट देतो म्हणून मला शेवटपर्यंत झुलवले. ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्याही डोळ्यात राहिलेल्या चार वर्षात अश्रू आणून बदला घेईन. एका दादाने दीड वर्ष माझ्या विरोधात कट कारस्थान केले पण दुसऱ्या दादाने (अजित पवार) दीड तासात माझा राजकीय पुनर्जन्म केला.
advertisement

आम्ही ज्यांना निवडून दिले त्या कॅबिनेट मंत्र्याने कामेच केली नाहीत

आम्ही ज्यांना निवडून दिले त्या कॅबिनेट मंत्र्याने (चंद्रकांत पाटील) आमच्या भागात काहीही विकास कामे केली नाहीत, असे सांगत बालवडकर यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न वापरून प्रभागातील रखडलेल्या विकास कामाचे व्हिडिओ दाखवले.

अजित पवार यांची बालवडकरांना ताकद, भाजपला खडे बोल सुनावले

advertisement
अमोल बालवडकर याची काय चूक होती? एखादा निर्णय घेताना कार्यकर्त्यांशी नीट संवाद साधता येतो, त्यांच्याशी बोलता येते. पण उमेदवारीसाठी त्यांना शेवटपर्यंत त्यांना खेळवत ठेवले आणि ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले. पक्ष वाढविण्याकरिता त्यांनी जीवाचे रान केले आणि तुम्ही त्यांना खड्यासारखे बाजूला केले, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे काय? असा सवाल करून अमोलच्या मागे मी ताकदीने उभा आहे, असे अजित पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अश्रूंचा बदला अश्रूनेच घेणार, चार दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या अजितदादांच्या पठ्ठ्याचा चंद्रकांतदादांना इशारा
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement