विमानाचा 'तो' व्हिडीओ शेअर, आता नियोजित पत्रकार परिषद पुढे ढकलली, जय पवार यांना काय सांगायचं? चर्चांना उधाण
- Published by:Sachin S
Last Updated:
जय पवार यांनी ६ दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाा होता. या व्हिडीओमध्ये एक पायलट सीटवर बसून चक्क झोपी गेला होता.
मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. पण, अजूनही काही प्रश्न अनुत्तरितच आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी अनेक गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आता अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण, ही पत्रकार परिषद आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी सोमवारी ९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच जय पवार हे माध्यमांसमोर येणार होते. एकीकडे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी विमान कंपनी आणि तपास यंत्रणेवर गंभीर आरोप करत आहे. त्यामुळे आता जय पवार हे कोणत्या मुद्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते.
advertisement
पण, आता आदल्या दिवशीच जय पवार यांची ही पत्रकार परिषद काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सदर पत्रकार परिषद नव्या तारखेला कधी आयोजित करण्यात येईल, याची माहिती माध्यम प्रतिनिधींना लवकरच कळविण्यात येईल. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, अशी माहिती जय पवार यांच्या टीमकडून देण्यात आली आहे.
जय पवारांनी व्हिडीओ केला होता शेअर
दरम्यान, जय पवार यांनी ६ दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाा होता. या व्हिडीओमध्ये एक पायलट सीटवर बसून चक्क झोपी गेला होता. विमान हवेत उडत असताना तो झोपलेला होता. पायलट सीटवर झोपलेली व्यक्ती ही रोहित सिंग असल्याचं समोर आलं होतं. VSR कंपनीच्या विमान कंपनीचे रोहित सिंग हे मालक आहे.
advertisement
advertisement
हा व्हिडिओ शेअर करत जय पवारांनी रोहित सिंगच्या अटकेची मागणी केली होती. माझ्या वडिलांना आपण गमावलं.ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो. या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमानं तात्काळ ग्राऊंड करण्यात यावीत आणि रोहिल सिंह यांना त्वरित अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असं म्हणत जय पवार यांनी आवाहन केलं होतं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 3:39 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
विमानाचा 'तो' व्हिडीओ शेअर, आता नियोजित पत्रकार परिषद पुढे ढकलली, जय पवार यांना काय सांगायचं? चर्चांना उधाण









