advertisement

Dubaki Wali Kadhi : कढी-पकोडे आवडतात, पण तेलकट खायचं नाही? बनवा खास डुबकीवाली कढी, खाऊन तृप्त व्हाल!

Last Updated:

Dubaki Wali Kadhi Recipe In Marathi : तुम्ही महाराष्ट्रीयन कढीसोबत गुजराती कढी, कढी-पकोडे किंवा सिंधी कढीबद्दल ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका असा कढीबद्दल सांगणार आहोत, जी अतिशय टेस्टी आणि तितकीच हेल्दी आहे.

डुबकीवाली कढी बनवण्याची पद्धत..
डुबकीवाली कढी बनवण्याची पद्धत..
मुंबई : बऱ्याच लोकांना कढी फार आवडते. महाराष्ट्रात साधारणपणे एका प्रकारची कढी बनवली जाते. मात्र इतरही अनेक प्रकारच्या कढी रेसिपी आहेत, ज्या लोकांना खूप आवडतात. तुम्ही महाराष्ट्रीयन कढीसोबत गुजराती कढी, कढी-पकोडे किंवा सिंधी कढीबद्दल ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका असा कढीबद्दल सांगणार आहोत, जी अतिशय टेस्टी आणि तितकीच हेल्दी आहे.
आज आपण छत्तीसगढची एक रिजनल रेसिपी, डुबकीवाली कढी याची रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी myflavourfuljourney या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली गेली आहे. ही रेसिपी कढी-पकोड्यासारखी आहे. पण यासाठी तुम्ही पकोडे म्हणजेच भजी टाळावी लागत नाही. म्हणून ही रेसिपी खूप हेल्दीदेखील आहे. चला पाहूया बनवण्याची पद्धत.
डुबकीवाली कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- अर्धा कप उडदाची डाळ
advertisement
- 4 ते 5 लसूण पाकळ्या
- 1 इंच आले
- 2 हिरव्या मिरच्या
- 1/2 चमचा काळी मिरी पावडर
- 1 कप दही
- 2 चमचे पीठ
- 2 कप पाणी
- तेल
- 1 चमचा जिरे
- मोहरी
- 1 मध्यम आकाराचा कांदा
- 8 ते 10 कढीपत्ता
advertisement
- 1 चमचा हळद
- 1 चमचा लाल मिरची पावडर
- काश्मिरी लाल मिरची पावडर
- कोथिंबीर
डुबकीवाली कढी बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी अर्धा कप उडदाची डाळ 4-5 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.
- उडीदाच्या डाळीत 4-5 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा काळी मिरी पावडर घालून बारीक करा.
advertisement
- त्यानंतर हे डाळीचे बॅटर फुलून येईपर्यंत हाताने फेटून घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ घाला.
- आता दुसऱ्या बाजूला 1 कप दही घ्या त्यात वरचे बॅटर 2 चमचे आणि 2 कप पाणी घालून मिक्स करा.
- आता गॅसवर कढई ठेवा आणि कढईत थोडे तेल टाकून ते गरम होऊ द्या.
- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 8-10 कढीपत्ता घाला.
advertisement
- त्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर घालून व्यवस्थित परतून घ्या.
- आता कढईमधे दह्याचे मिश्रण घाला आणि चवीपुरते मीठ घालून कढीला एक उकळी येऊ द्या.
- उकळी आल्यानंतर डाळीच्या बॅटरचे छोटे छोटे गोळे कढीमध्ये टाका.
- हे पकोडे 7-8 मिनिटे आणखी शिजवा.
- यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर आणि लाल तिखटाची फोडणी घाला.
advertisement
- शेवटी कढीमध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
advertisement
ही कढी चवीला खूप अप्रतिम लागते आणि हेल्दीदेखील आहे. ही तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. आपल्या नेहमीच्या कढीऐवजी एकदा ही कढी बनवून पाहा. घरच्यांना नक्की आवडेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Dubaki Wali Kadhi : कढी-पकोडे आवडतात, पण तेलकट खायचं नाही? बनवा खास डुबकीवाली कढी, खाऊन तृप्त व्हाल!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement