नवीन वर्षात शेतकऱ्यांमध्ये या पिकाची मोठी क्रेझ! फक्त अडीच महिन्यांत एकरी करताय ४ लाखांची कमाई

Last Updated:

Agriculture News :  शेतीत पारंपरिक पिकांबरोबरच उच्च मूल्याची भाजीपिके घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सध्या आरोग्याबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे ब्रोकोलीला (Broccoli) बाजारात मोठी मागणी आहे.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : शेतीत पारंपरिक पिकांबरोबरच उच्च मूल्याची भाजीपिके घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. सध्या आरोग्याबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे ब्रोकोलीला (Broccoli) बाजारात मोठी मागणी आहे. हॉटेल, मॉल, सुपरमार्केट, तसेच शहरांतील आरोग्यविषयक आहार घेणाऱ्या ग्राहकांमध्ये ब्रोकोलीचा वापर वाढत आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास ब्रोकोली पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येऊ शकते.
advertisement
ब्रोकोली पिकासाठी हवामान आणि जमीन
ब्रोकोली हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य मानले जाते. अतिउष्ण किंवा अति थंड हवामानात उत्पादनावर परिणाम होतो. मध्यम ते भारी, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन ब्रोकोलीसाठी उत्तम ठरते. जमिनीचा सामू (pH) ६ ते ७ दरम्यान असावा.
advertisement
लागवड पद्धत
ब्रोकोलीची लागवड प्रामुख्याने रोपांद्वारे केली जाते. नर्सरीत २५ ते ३० दिवसांत रोपे तयार होतात. एकरी साधारण ६ ते ७ हजार रोपांची लागवड करता येते. दोन ओळींतील अंतर ४५ ते ६० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर ४५ सेंमी ठेवले जाते. योग्य अंतरामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते.
advertisement
एकरी खर्च किती येतो?
ब्रोकोली लागवडीसाठी एकरी खर्च साधारण ५० हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत येतो. यामध्ये रोपे किंवा बियाणे, मशागत, खत व सेंद्रिय खत, कीड-रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि मजुरीचा समावेश असतो. ठिबक सिंचन असल्यास पाण्याचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते.
advertisement
उत्पादन आणि उत्पन्न
ब्रोकोली पिकातून एकरी सरासरी ६ ते ८ टन उत्पादन मिळू शकते. बाजारात ब्रोकोलीचा दर हंगामानुसार ३० ते ६० रुपये प्रति किलो दरम्यान असतो. जर सरासरी ७ टन उत्पादन आणि ४० रुपये प्रतिकिलो दर गृहीत धरला, तर एकरी सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचे एकूण उत्पन्न मिळू शकते. खर्च वजा करता शेतकऱ्याला एकरी ३ लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळण्याची शक्यता असते.
advertisement
बाजारपेठ आणि विक्री
ब्रोकोली ही पटकन खराब होणारी भाजी असल्याने काढणी, पॅकिंग आणि वाहतूक याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. थेट हॉटेल, रेस्टॉरंट, सुपरमार्केट, तसेच शहरांतील भाजी बाजारात विक्री केल्यास चांगला दर मिळतो. काही शेतकरी करार शेतीच्या माध्यमातूनही ब्रोकोलीची विक्री करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
नवीन वर्षात शेतकऱ्यांमध्ये या पिकाची मोठी क्रेझ! फक्त अडीच महिन्यांत एकरी करताय ४ लाखांची कमाई
Next Article
advertisement
BMC Election Neil Somaiya : सोमय्यांकडून मुलाविरोधातील लढतीत कोणी नसल्याचा दावा, ठाकरे गटाचा मोठा डाव, वॉर्ड १०७ मधलं गणित बदललं
सोमय्यांकडून मुलाविरोधातील लढतीत कोणी नसल्याचा दावा, ठाकरे गटाचा मोठा डाव, वॉर्ड
  • नील सोमय्या यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार नसल्याचा दावा केला होता.

  • नील सोमय्या यांचा विजय सहज सोपा झाला असल्याचा दावा करण्यात आला होता.

  • मात्र, आता ठाकरे गटाने आता मोठा डाव खेळला आहे.

View All
advertisement