Government Job : भारत सरकारच्या नामांकित कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी;पगार मिळणार भरघोस;अर्ज कसा करावा?

Last Updated:

Engineer Jobs : बीएचईएलकडून इंजिनिअर्ससाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर आणि सुपरवायझर पदांसाठी आकर्षक पगारासह नोकरीची संधी आहे.

News18
News18
इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत हॅव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मार्फत प्रोजेक्ट इंजीनिअर आणि प्रोजेक्ट सुपरवायझर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मॅकेनिकलसह विविध तांत्रिक विभागांमध्ये ही भरती होणार असून, अनुभवी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
भारत सरकारच्या नामांकित कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 12 जानेवारी 2026 पर्यंत BHEL च्या अधिकृत careers.bhel.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी उमेदवारांकडे फुलटाइम इंजीनिअरिंग किंवा टेक्नोलॉजीमधील पदवी अथवा संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी किमान 60 टक्के गुणांची अट आहे, तर SC/ST उमेदवारांसाठी 50 टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तसेच किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
advertisement
प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी संबंधित शाखेतील इंजीनिअरिंग डिग्री आणि किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 25 ते 32 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
पगार असणार किती?
प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी दरमहा 95,000 ते 1 लाख रुपये वेतन मिळणार असून प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी 45,000 ते 48,000 रुपये मासिक पगार दिला जाणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना 236 रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. भरतीविषयी सविस्तर माहिती आणि अधिसूचना BHEL च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Government Job : भारत सरकारच्या नामांकित कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी;पगार मिळणार भरघोस;अर्ज कसा करावा?
Next Article
advertisement
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election:  ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्या घोषणानी बीएमसी निवडणुकीचा गेम बदलणार?
ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्य
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज प्रचाराचा मेगा संडे

  • महापालिका निवडणुकीत युती जाहीर झाल्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून वचननामा जाहीर करण्य

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास २० वर्षानंतर शिवसेना भवनात पाय ठेवणार आहेत.

View All
advertisement