IND vs NZ ODI : गंभीरचा ग्रीन सिग्नल, श्रेयस अय्यरचं वनडे टीममध्ये कमबॅक पण BCCI ने एक अट घातली! कोणती? पाहा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer returns In Team India : टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या श्रेयस अय्यरला टीममध्य़े घेण्यासाठी बीसीसीआयने आपले नियम कायम ठेवले अन् त्याला अट घातली आहे.
India vs New Zealand ODI : बीसीसीआयने शनिवारी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरचे उपकर्णधार म्हणून पुनरागमन झालं आहे. स्प्लीनच्या दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं, मात्र आता संघात स्थान मिळालं असलं तरी श्रेयस अय्यरला एक अट घालण्यात आली आहे.
श्रेयस अय्यरला अट घातली
टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या श्रेयस अय्यरला टीममध्य़े घेण्यासाठी बीसीसीआयने आपले नियम कायम ठेवले अन् त्याला अट घातली आहे. श्रेयस अय्यरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली मॅच फिटनेस सिद्ध करावी लागेल. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस (COE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच तो 11 जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होणाऱ्या मालिकेत खेळू शकणार आहे.
advertisement
मोहम्मद सिराजचे वनडे संघात पुनरागमन
दुसरीकडे, स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याला या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. पूर्ण 10 ओव्हर बॉलिंग करण्याची परवानगी COE कडून न मिळाल्याने निवड समितीने हा निर्णय घेतला. मात्र, विकेटकीपर ऋषभ पंत याने संघात आपली जागा मिळवण्यात यश मिळवलं आहे. अनुभवी बॉलर मोहम्मद शमी याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही निवडकर्त्यांनी त्याच्या नावाचा विचार केला नाही, तर मोहम्मद सिराज याचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
advertisement
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (व्हॉइस कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही 3 सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होईल. त्यानंतर 14 जानेवारीला राजकोट आणि 18 जानेवारीला इंदूर येथे अखेरचा सामना खेळवला जाईल. घरच्या मैदानावर होणारी ही मालिका भारतासाठी वर्ल्ड कपची महत्त्वाची रंगीत तालीम ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 10:37 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ ODI : गंभीरचा ग्रीन सिग्नल, श्रेयस अय्यरचं वनडे टीममध्ये कमबॅक पण BCCI ने एक अट घातली! कोणती? पाहा










