तुम्ही जुना फ्लॅट विकत घेताय का? मग आधी हे काम करून घ्याच, अन्यथा होईल फसवणूक

Last Updated:

Property Rules :  घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेक जण नव्या घराऐवजी रिसेल म्हणजेच जुना फ्लॅट खरेदी करण्याकडे वळत आहेत.

Property Rules
Property Rules
मुंबई : घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेक जण नव्या घराऐवजी रिसेल म्हणजेच जुना फ्लॅट खरेदी करण्याकडे वळत आहेत. रिसेल फ्लॅट तुलनेने स्वस्त मिळतो, परिसर आधीच विकसित असतो आणि ताबडतोब ताबा मिळतो, ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. पण योग्य खबरदारी न घेतल्यास हा निर्णय तुमच्यासाठी आर्थिक संकट ठरू शकतो. विशेषतः कर थकबाकी, कायदेशीर अडचणी आणि फसवणुकीचे प्रकार रिसेल फ्लॅट खरेदीत मोठ्या प्रमाणात आढळतात.
advertisement
अनेक वेळा फ्लॅट विक्रेते मालमत्ता कर, पाणीपट्टी, देखभाल शुल्क किंवा इतर महापालिका करांची थकबाकी लपवतात. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर नव्या मालकाच्या नावावर फ्लॅट करताना ही थकबाकी समोर येते. महापालिका स्पष्टपणे सांगते की, सर्व थकीत कर भरल्याशिवाय नावांतरण होणार नाही. परिणामी, विक्रेत्याच्या चुकीचा फटका थेट खरेदीदाराला बसतो आणि हजारो ते लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो.
advertisement
कोणत्या गोष्टी पाळाव्यात?
रिसेल फ्लॅट खरेदीपूर्वी काही महत्त्वाची कामे करणे अत्यावश्यक आहे. सर्वात आधी महापालिकेच्या मालमत्ता कराच्या पावत्या तपासा. मागील काही वर्षांचा कर नियमित भरलेला आहे का, याची खात्री करून घ्या. केवळ विक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता, थकबाकी नसल्याचे लेखी प्रमाणपत्र (No Dues Certificate) मागणे गरजेचे आहे.
advertisement
दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे दस्त नोंदणीपूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रांची तपासणी. मूळ खरेदीखत, मागील विक्री व्यवहारांची साखळी, सोसायटीचे एनओसी, बँक कर्ज असल्यास कर्जमुक्ती प्रमाणपत्र यांची पडताळणी करा. शक्य असल्यास कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही फायद्याचे ठरते.
अलीकडेच राज्य सरकारने रिसेल मालमत्ता व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. ‘आय-सरिता’ या दस्त नोंदणी पोर्टलवर आता दस्त नोंदणी करतानाच महापालिकेच्या कर थकबाकीची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे संबंधित फ्लॅटवर किती कर बाकी आहे, कोणते शुल्क अपूर्ण आहे, हे व्यवहाराच्या आधीच स्पष्ट होते. यामुळे खरेदीदाराची होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे.
advertisement
तरीदेखील, खरेदीदारांनी केवळ प्रणालीवर अवलंबून न राहता स्वतःही दक्ष राहणे आवश्यक आहे. सोसायटीकडे थकीत देखभाल शुल्क आहे का, पाणी किंवा वीज बिल बाकी आहे का, याची चौकशी करा. फ्लॅटवर कोणताही कायदेशीर वाद, नोटीस किंवा तारण नाही ना, याची खात्री करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
advertisement
रिसेल फ्लॅट स्वस्त वाटतो म्हणून घाईघाईने निर्णय घेणे टाळा. थोडी काळजी, योग्य चौकशी आणि सर्व कागदपत्रांची खातरजमा केली, तर तुमचे स्वप्नातील घर खरेदी सुरक्षित आणि निश्चिंत होऊ शकते. अन्यथा, एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभराची कमाई वाया जाण्याची वेळ येऊ शकते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुम्ही जुना फ्लॅट विकत घेताय का? मग आधी हे काम करून घ्याच, अन्यथा होईल फसवणूक
Next Article
advertisement
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election:  ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्या घोषणानी बीएमसी निवडणुकीचा गेम बदलणार?
ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्य
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज प्रचाराचा मेगा संडे

  • महापालिका निवडणुकीत युती जाहीर झाल्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून वचननामा जाहीर करण्य

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास २० वर्षानंतर शिवसेना भवनात पाय ठेवणार आहेत.

View All
advertisement