advertisement

Beed: तिच्या मागे कुणीचं नव्हतं, तिच्या आयुष्याचा खेळ मांडला; एकाच महिन्यात 3 वेळा विकून लावलं लग्न, बीडमधला भयानक प्रकार

Last Updated:

लातूर येथील एका 21 वर्षांच्या तरुणीचं दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये एका तरुणासोबत लग्न लावून दिलं होतं. पण

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
बीड : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २१ वर्षीय विवाहित तरुणीची एकाच महिन्यात ३ ठिकाणी विक्री करून जबरदस्तीने तीन वेळा लग्न लावून दिल्याचा संताापजनक प्रकार समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेनं विष पिऊन आत्महत्येचाा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणात मानवी तस्करी करणारं रॅकेट असल्याचं साांगितलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालसेपोटी मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे.  लातूर येथील एका 21 वर्षांच्या तरुणीचं दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये एका तरुणासोबत लग्न लावून दिलं होतं. पण, पीडितेच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. त्यामुळे पीडित तरुणी माहेरी रााहण्यास गेली होती.  पीडित तरुणीच्या आजी-आजोबाचं निधन झालं. त्याामुळे पीडित तरुणी निराधार झााली. शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं पुण्यात एका एजंट ओळखीचा आहे, तुझं दुसरं लग्न लावून देते, असं आमिष दाखवलं.
advertisement
पीडित तरुणीचा मांडला लिलाव
पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेव्हा या पीडितेला एंजटकडे नेण्यात आलं. तेव्हा त्यांनी तिचा अक्षरश: बाजार मांडला. पुण्यातील महानंदाने एजंटने कात्रजमधील एका व्यक्तीकडून ५ लाख रुपये घेऊन जबरदस्तीने लग्न लावून दिलं. त्यानंतर ही पीडित तरुणी कात्रजमध्ये १० दिवस राहिली. हा प्रकार इथंच थांबला नाही. त्यानंतर तिला कुरक्षेत्र इथं एका माणसाकडे ४.५ लाखांना विकण्यात आलं. तिथेही पीडित तरुणीला ५ ते ६ दिवस ठेवण्यात आलं होतं.
advertisement
३ लग्नानंतर आणखी एका लग्नाची ऑफर
 त्यानंतर तुळजापूर येथील एजंटने कानडी बुद्रुक इथं एका व्यक्तीकडून साडेचार लाख रुपये घेऊन १ मार्च २०२६ रोजी लग्न लावून दिलं. फक्त एकाच महिन्यात पीडित तरुणीचं तीन ठिकाणी लग्न लावून देण्यात आलं. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. एजंटने फोन करून चौथ लग्न लावून देतो, असं फोन करून सांगितलं. त्यानंतर पीडित तरुणी पुरती खचली.  मानसिक छळ आणि या अमानुष प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आष्टी तालुक्यात पीडितेलाा रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहे.
advertisement
पतीचाही समावेश
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचाा जबाब नोंदवून घेतला.  या प्रकरणी आष्टी पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामध्ये पीडितेच्या पतीचाही समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस करत आहे. या घटनेमुळे मानवी तस्करीच्या वाढत्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: तिच्या मागे कुणीचं नव्हतं, तिच्या आयुष्याचा खेळ मांडला; एकाच महिन्यात 3 वेळा विकून लावलं लग्न, बीडमधला भयानक प्रकार
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement