'माझी बायको सगळ्यात बेस्ट!' लग्नानंतर रश्मिकाची मोठी कामगिरी; अभिमानाने फुलला विजय, शेअर केली स्पेशल पोस्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika Mandanna-Vijay Deverkonda: २६ फेब्रुवारीला थाटामाटात लग्नगाठ बांधल्यानंतर, आता या जोडीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पॉवर कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या आयुष्यात सध्या सुखाचे दिवस न्हाऊन निघत आहेत. २६ फेब्रुवारीला थाटामाटात लग्नगाठ बांधल्यानंतर, आता या जोडीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रश्मिका मंदाना हिने तिच्या 'द गर्लफ्रेंड' (The Girlfriend) या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा (Best Actress) पुरस्कार पटकावला आहे. आपल्या लाडक्या बेटर हाफच्या या यशाने विजय देवरकोंडाचा ऊर अभिमानाने भरून आला असून त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आनंद साजरा केला आहे.
रश्मिकासाठी विजयची खास पोस्ट
विजयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रश्मिकाच्या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत फक्त दोन शब्द लिहिले, पण त्यात बरंच काही होतं. विजयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर "Happy and Proud" असं म्हणत त्याने रश्मिकाचं कौतुक केलंय. राहुल रवींद्रन दिग्दर्शित 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकलेल्या 'भूमा देवी' नावाच्या मुलीची भूमिका रश्मिकाने इतकी जिवंत केली की, समीक्षकांनीही तिचं तोंडभरून कौतुक केलं.
advertisement

रश्मिकाचीही प्रेमळ साद
पती विजयने केलेलं कौतुक पाहून रश्मिकाही हुरळून गेली आहे. तिने विजयची स्टोरी रिपोस्ट करत एक सुंदर संदेश लिहिला आहे. रश्मिकाने लिहिलं आहे, विजू, जेव्हा तू म्हणतोस की तुला माझा अभिमान वाटतो, ते मला खूप आवडतं. या नवविवाहित जोडप्याला सर्वांसमोर एकमेकांवर अशाप्रकारे प्रेम व्यक्त करताना पाहून त्यांच्या चाहत्यांना एक वेगळाच आनंद मिळत आहे.
advertisement

गुपचूप डेटिंग ते उदयपूरची राजेशाही लग्नगाठ
गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत होत्या, पण या जोडीने नेहमीच मौन पाळलं होतं. अखेर २०२६ च्या सुरुवातीला त्यांनी लग्नाची घोषणा केली आणि २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी साता जन्माच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर हैदराबादच्या ताज कृष्णा हॉटेलमध्ये पार पडलेल्या रिसेप्शनची चर्चा अजूनही थांबलेली नाही. अल्लू अर्जुन, राम चरण, करण जोहर आणि कृती सेनन सारख्या स्टार्सनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
advertisement
लाल साडी अन् पारंपरिक थाट
रिसेप्शनमधील रश्मिकाचा रेड मैसूर सिल्क साडीतला लूक अजूनही चाहत्यांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीये. काळ्या-सोनेरी बॉर्डरची साडी, गळ्यात भरजरी सुवर्णालंकार आणि रश्मिकाचं गोड हसू! तर दुसरीकडे विजयने पारंपरिक वेष्टी आणि शर्टमध्ये आपला पारंपरिक आणि साऊथचा स्वॅग जपला होता. या जोडीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने लिहिलंय, "रश्मिका ही जगातील सर्वात आनंदी नवरी दिसतेय, कारण विजय तिची राणीसारखी काळजी घेतोय."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझी बायको सगळ्यात बेस्ट!' लग्नानंतर रश्मिकाची मोठी कामगिरी; अभिमानाने फुलला विजय, शेअर केली स्पेशल पोस्ट








