advertisement

Antibiotics Side Effects : अँटीबायोटिक्स घेताय? जरा जपून.. तुमचं लिव्हर होऊ शकतं डॅमेज! संशीधकांनी दिला इशारा

Last Updated:
IIT Bombay antibiotic study : आपल्याला कोणतंही इन्फेक्शन झालं की डॉक्टर अँटीबायोटिक्स गोळ्या लिहून देतात. काही लोकांना काही त्रास सतत होत असतात तर ते अशावेळी गोळ्या लक्षात ठेवतात आणि पुढच्यावेळी डॉक्टरकडे न जाता, त्याच गोळ्या घेतात. पण या अँटीबायोटिक्सच्या गोळ्या घेणं खरंच सुरक्षित असतं का? त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो याबद्दल शास्त्रज्ञांनी सविस्तरपणे सांगितलं आहे. चला पाहूया.
1/9
अँटीबायोटिक्स गोळ्या घेतल्यानंतर रुग्णांना बरं वाटतही असेल. पण कोणताही उपचार प्रत्येकवेळी योग्य नसतो. त्यामुळे डॉक्टरांना विचारूनच गोळ्या घ्याव्या. मात्र तरीही वारंवार अँटीबायोटिक्सच्या गोळ्या घेणं आपल्या शरीरासाठी योग्य नसतं. त्याचे आपल्या शरीरावर आणि लिव्हरवर कसे परिणाम होऊ शकतात, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

2/9
बॅक्टेरियाचा संसर्ग घालवण्यासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्स लिहून देतात. या गोळ्या गंभीर संसर्गांशी लढण्यास मदत करतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. कारण त्यांचा चुकीचा वापर लिव्हरसाठी धोकादायक ठरू शकतो. असं अनेकदा अढळलंय की, काही अँटीबायोटिक्स लिव्हरमधील एंजाइम वाढवतात किंवा तीव्र जळजळ निर्माण करतात. यामुळं लिव्हर निकामी होण्याचा धोका वाढतो.

3/9
काही अँटीबायोटिक्स लिव्हरचे जास्त नुकसान का करतात आणि काही कमी नुकसान का करतात.. याबद्दल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई येथील संशोधकांनी अभ्यास केला. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, यकृत हा असा अवयव आहे, जो औषधं फिल्टर करतो. यामुळं ड्रग-इंड्यूस्ड लिव्हर इंज्युरी म्हणजेच DILI होते. अशा परिस्थितीत अनेक औषधं बाजारातून काढून टाकली जातात. कारण ती यकृताला नुकसान पोहोचवतात.

4/9
नवीन अभ्यासाचे नेतृत्व आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक आशुतोष कुमार आणि मलेशियाच्या सनवे विद्यापीठाचे प्राध्यापक वेट्रिसेलवन सुब्रमण्यम यांनी केले. या अभ्यासात मागील सिद्धांतांना खोडून काढणारे अनेक निष्कर्ष उघड झाले आहेत. पूर्वी असं मानलं जायचं की, औषधं जितके जास्त पेशी पडद्याला व्यत्यय आणते किंवा नुकसान करते तितके ते जास्त विषारी असते. मात्र नव्या अभ्यासात याच्या उलट गोष्टी समोर आल्या आहे. नव्या अभ्यासानुसार, लिव्हरच्या नुकसानाचं खरं कारण औषधाची क्षमता नसून यकृताच्या पेशींना औषध कसे जोडते, हे आहे.

5/9
तज्ञांनी दोन शक्तिशाली अँटीबायोटिक्स, टेकोप्लानिन आणि ओरिटाव्हॅन्सिनची तुलना केली. या अँटीबायोटिक्सचा वापर न्यूमोनिया आणि एमआरएसए सारख्या गंभीर जिवाणू संसर्गांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे दोन्ही अँटीबायोटिक्स रासायनिकदृष्ट्या, जीवाणू मारण्याची समान यंत्रणा असूनही, यातील टेकोप्लानिन लिव्हरसाठी अधिक हानिकारक असल्याचं आढळलंय. याउलट आपले शरीर ओरिटाव्हॅन्सिन चांगले सहन करते.

6/9
या शोध लावण्यासाठी संशोधकांनी डायनॅमिक लाइट स्कॅटरिंग आणि क्रायो-टीईएम सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. अभ्यासात असं दिसलं की, ओरिटाव्हॅन्सिन पेशी पडद्यात खोलवर प्रवेश करते, त्याची रचना बदलते. परंतु लिव्हरचं खूप नुकसान करत नाही. याउलट टेकोप्लानिन पेशी पडद्याच्या पृष्ठभागावर चिकटून राहते. पृष्ठभागावर दीर्घकाळ राहिल्यानं लिव्हरच्या पेशींसाठी अधिक हानिकारक ठरते. अभ्यासाचे प्रमुख लेखक आकाश कुमार झा यांच्या मते, औषध पृष्ठभागावर चिकटून राहिल्याने पेशींच्या इलेक्ट्रिकल गुणधर्मांमध्ये आणि आंतरकोशिकीय संप्रेषणात व्यत्यय येतो. यामुळं शेवटी लिव्हर निकामी होते.

7/9
उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये असं आढळलं की, टायकोप्लॅनिन दिलेल्या उंदरांच्या लिव्हरमधील एंजाइम, जळजळ आणि ऊतींचे नुकसान खूप वाढलं.  याउलट ओरिटाव्हॅन्सिन दिलेल्या उंदरांना खूप कमी आणि अधिक गंभीर परिणाम जाणवले. यावरून असं सूचित होतं की औषधाची टॉक्सिसिटी पेशीच्या पडद्यावरील त्याच्या स्थानावर अवलंबून असते. जर एखादे औषध पेशीच्या बाह्य लिपिड थराच्या पॅकेजिंग आणि हालचालीवर परिणाम करत असेल तर ते लिव्हरसाठी मंद विष म्हणून काम करते.

8/9
आयआयटी मुंबईचा हा अभ्यास भविष्यात सुरक्षित औषधांच्या विकासात महत्त्वाचा ठरू शकतो. प्राध्यापक कुमार यांनी स्पष्ट केले की, टायकोप्लॅनिन आणि ओरिटाव्हॅन्सिन सारखी औषधं सामान्य सर्दीसाठी नाहीत. ती फक्त गंभीर आजारी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना दिली जातात, ज्यांचे बॅक्टेरिया सामान्य प्रतिजैविकांना प्रतिरोधक बनले आहेत. कमकुवत प्रतिकारशक्ती, मधुमेह किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी ही औषधं शेवटचा उपाय आहेत. रुग्णाच्या लिव्हरसाठी कोणते औषध कमी धोकादायक आहे, हे समजून घेतल्यानं डॉक्टरांना योग्य उपचार निवडण्यास आणि रुग्णांच्या जीवाला होणारे अतिरिक्त धोके टाळण्यास मदत होईल.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement