advertisement

Ear Care : नॉइज कॅन्सलेशन इअरबड्समुळे कायमचं बहिरेपण! अफवा की सत्य? ईएनटी डॉक्टरने सांगितले फॅक्ट्स

Last Updated:
आजकाल इअरबड्स वापर फॅशन झालीये. घर असो, ऑफिस असो किंवा प्रवासादरम्यान वेळ घालवणं असो अनेक जण तुम्हाला इअरबड्स लावलेले दिसतात. तरुणामध्ये हे प्रमाण आधिक आहे. इअरबड्स एवढे कॉमन झाले आहे की, अनेक जण कानात इअरफोन घालून स्वतःच्या जगात मग्न असल्याचे तुम्ही देखील पाहिले असेल. त्यात आता नॉइज कॅन्सलेशन हे फीचर्स देखील येऊ लागले आहे.
1/9
आजकाल स्मार्टफोनचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी होत आहे. यात ऑनलाइन वर्ग, गेमिंग, मिटिंग, ऑफिस वर्क, ट्रेडिंग आणि इतर कामांमुळे बहुतांश लोक हे सतत फोन पाहण्यात गुंतलेले असतात. या कामांसाठी अनेकांना इअरबड्सचा वापर करावा लागतो. याशिवाय इंस्टराग्रामवरील रिल आणि युट्यूब फेसबूकमधील शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात अनेक जण तासंतास घालवतात. यामुळे इअरबड्स अनेकांसाठी जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत.

2/9
परंतु तासन्तास बाहेरील जगाला म्यूट करणारे हे इअरबड्स आपल्या कानांसाठी किती धोकादायक आहे आणि त्यामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (शालीमार बाग) येथील ईएनटीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुवेन कालरा यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.

3/9
इअरबड्समधील अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी) तंत्रज्ञान हे बाहेरचा किंवा आजुबाजुचा आवाज कमी करते. यामुळे आवाज न वाढवता स्पष्ट ऐकायला येते. परंतु खरा धोका या तंत्रज्ञानात नाही तर उच्च आवाजात आणि दीर्घकाळ इअरबड्सचा वापर करण्यात आहे.

4/9
सर्वात आधी तर हे समजून घ्या की, आपल्या कानात अत्यंत नाजूक 'केसांच्या पेशी' असतात ज्या आवाजाचे मज्जातंतू सिग्नलमध्ये रूपांतर करतात. जेव्हा आपण सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात असतो तेव्हा या पेशी खराब होऊ लागतात आणि एकदा नुकसान झाल्यानंतर त्या पुन्हा निर्माण होत नाहीत. यामुळे कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होऊ शकते.

5/9
जागरणमध्ये डॉक्टर कलर यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले गेले आहे की, यासंदर्भातील जागतिक आकडेवारी चिंताजनक आहे. असुरक्षित इअरफोन वापरामुळे जगभरातील 1 अब्जाहून अधिक तरुण श्रवणशक्ती गमावण्याच्या मार्गावर आहेत. डिव्हाइस नॉइस कँन्सलेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा नसेल, परंतु सतत आणि मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने टिनिटस (कानात वाजणे) आणि श्रवण थकवा येण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

6/9
एएनसी फीचरमुळ तुम्ही कमी आवाजात ऑडिओ ऐकत असलात तरी दररोज 5 ते 8 तास इअरफोन घालणे हानिकारक असू शकते. तुम्हाला तुमच्या कानात जडपणा, शिट्टी वाज किंवा मऊ शब्द ऐकण्यात अडचण येत असेल, तर ही कानाच्या नुकसानाची सुरुवातीची लक्षणे आहेत.

7/9
तुमचे कान कसे सुरक्षित ठेवण्यासाठी 60-60 नियम' पाळू शकता. एका वेळी 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ इअरफोन घालू नका आणि आवाज 60 टक्क्यांपेक्षा जास्त सेट करू नका. तसेच सतत वापर टाळा, कानांना विश्रांती द्या आणि तुमच्या फोनवर आवाज मर्यादा सेटिंग चालू करा.

8/9
याशिवाय कानात लावलेल्या हेडफोनपेक्षा ओव्हर-इअर हेडफोन सुरक्षित असतात. तुम्हाला कानात दुखणे, जडपणा किंवा अस्पष्ट ऐकू न येणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब ईएनटी तज्ञाचा सल्ला घ्या.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement